AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Air Force : ‘बाहुबली’मुळे इंडियन एअर फोर्सची ताकत आणखी वाढणार, काय आहे C-295?

C-295 चे फायदेच इतके आहेत की, मन खूश होईल. देशात येणाऱ्या या पहिल्या एयरफ्राफ्टच इंडक्शन हिंडन एअरबेसवर होणार आहे. अशी 56 एयरक्राफ्ट आणण्याची योजना होती.

Indian Air Force : 'बाहुबली'मुळे इंडियन एअर फोर्सची ताकत आणखी वाढणार, काय आहे C-295?
IAF C 295
| Updated on: Sep 13, 2023 | 4:05 PM
Share

नवी दिल्ली : देशाला आज पहिलं C-295 टॅक्टिकल मिलिट्री एयर लिफ्ट प्लेन मिळणार आहे. स्पेनच्या सेविले प्लांटमध्ये हे प्लेन तयार करण्यात आलय. हे प्लेन भारतात आणण्यासाठी एअर फोर्स चीफ एअर चीफ मार्शल वीआर चौधरी स्पेनमध्ये दाखल झाले आहेत. आगरा एअरबेसवर या विमानाची तैनाती केली जाईल. C-295 टॅक्टिकल मिलिट्री एयर लिफ्ट प्लेनच वैशिष्ट्य जाणून घेऊया. C-295 हे कुठल्याही बाहुबली एयरक्राफ्टपेक्षा कमी नाहीय. देशात येणाऱ्या या पहिल्या एयरफ्राफ्टच इंडक्शन हिंडन एअरबेसवर होणार आहे.

दुसरं C-295 एयर लिफ्ट प्लेन मे 2024 मध्ये मिळेल. मीडिया रिपोर्ट्नुसार, स्पेनमधून अशी 56 एयरक्राफ्ट आणण्याची योजना होती. त्यातली 16 पूर्णपणे रेडी विमान भारतात येतील. अन्य 40 विमानं गुजरातच्या वडोदरामध्ये तयार केली जातील. 2024 मध्ये C-295 विमान बनवण्याच काम टाटा एडवांस सिस्टम कंपनीला मिळालं. बाहुबली किती खास आहे, जाणून घ्या.

शॉर्ट टेकऑफ आणि लँडिंगमध्ये एक्सपर्ट : या विमानाचे अनेक फायदे आहेत. म्हणून हे दुसऱ्या ऑपरेशनल एयरक्राफ्टपेक्षा वेगळं आहे. इमर्जन्सीमध्ये शॉर्ट टेकऑफ आणि लँडिंग शक्य आहे. फक्त 320 मीटरवरुन टेक-ऑफ करण्याची क्षमता आहे. त्याशिवाय लँडिंगसाठी 670 मीटर पुरेस आहे.

डोंगराळ भागात इमर्जन्सी ऑपरेशन शक्य : कमी जागेत लँडिंग आणि टेकऑफ शक्य असल्याने डोंगराळ भागात ऑपरेशनसाठी हे प्लेन फायद्याच ठरेल. लडाख, कश्मीर, सिक्किम आणि आसाम सारख्या डोंगराळ भागात हे प्लेन जास्त उपयुक्त आहे. रेसक्यु ऑपरेशनमध्येही खूप उपयोगाला येईल.

सलग 11 तास उड्डाण करण्याची क्षमता : हे विमान सलग 11 तास उड्डाण करण्यास सक्षम आहे. या विमानाची लांबी 24.45 मीटर आहे. रुंदी 8.65 मीटर आहे. 30 हजार फिट उंचीवरुन उड्डाण करण्यास सक्षम आहे.

7,050 KG पेलोड उचलण्यास सक्षम : C-295 टॅक्टिकल मिलिट्री एयर लिफ्ट प्लेन 7,050 किलोच पेलोड वाहून नेण्यास सक्षम आहे. एकाचवेळी 71 सैनिक, 44 पॅराट्रूपर्स, 24 स्ट्रेचर आणि 5 कार्गो प्लेट नेण्यास सक्षम आहे. लोडिंग-अनलोडिंग रॅम्प डोरमुळे बनत सोपं : एयरक्राफ्टच्या मागच्या भागात रॅम्प डोर आहे. यात इमर्जन्सी समयी लोडिंग आणि अनलोडिंग सोपं होऊन जातं . त्याशिवाय टच स्क्रीन स्मार्ट कंट्रोल सिस्टम आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.