
तुम्ही अनेकदा ट्रेननं प्रवास केलाच असेल, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी जवळपास सर्वजण रेल्वेच्या प्रवासालाच पसंती देतात, त्यामागे दोन कारणं आहेत. एक तर ट्रेनचा प्रवास हा बसच्या तुलनेत अधिक आरामदायी असतो, ट्रेनमध्ये सर्व सोई सुविधा उपलब्ध असतात, तसेच ट्रेनचा प्रवास हा बसच्या तिकिटापेक्षा स्वस्त देखील असतो. तुम्ही जेव्हा लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बसची निवड करतात, तेव्हा तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात, तसेच तिकिट देखील जास्त असते. दुसरीकडे तुम्ही जर दूरवरच्या प्रवासासाठी विमानाचा विचार करत असाल तर विमानाचा प्रवास हा ट्रेनपेक्षा अधिक आरामदायी असतो, मात्र विमानाचं तिकीट प्रत्येकाच्याच खिशाला परवडेल असं नाही. त्यामुळे आजही अनेकजण ट्रेनच्याच प्रवासाला आपली पसंती दर्शवतात.
तुम्ही जेव्हा ट्रेनमधून प्रवास करता, तेव्हा तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की ट्रेनमधून दारूची वाहतूक करणं कायद्याच्या दृष्टीकोनातून वैध आहे की अवैध? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. ट्रेनमधून बाटली बंद दारूची वाहतूक करावी की नाही? याबाबत ट्रेनचा असा कोणताच स्पष्ट नियम नाही, मात्र तुम्ही ज्या राज्यात जाणार आहात, किंवा तुम्ही ज्या राज्यात राहतात, तेथील राज्याचं दारू विक्रीचं धोरण काय आहे? यावर तुम्ही रेल्वेमधून दारूची वाहतूक करू शकता की नाही? हे ठरतं.
उदाहरण द्यायचं झालं तर प्रत्येक राज्याचं कर धोरण हे वेगवेगळं असतं. गोव्यामध्ये दारू स्वस्त मिळते, कारण तेथील सरकारचं कर धोरण तसं आहे. मात्र ही दारू महाराष्ट्रात तुम्हाला महाग मिळते, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही गोव्यातून महाराष्ट्रात रेल्वे काय कुठल्याच मार्गाने थेट दारूची वाहातूक करू शकत नाहीत.
समजा तुम्ही अशा राज्यात जाणार असाल ते स्टेट पूर्णपणे ड्राय आहे, तिथे दारूच्या सर्व प्रकारावर बंदी आहे, अशाही परिस्थितीमध्ये तुम्ही त्या राज्यातून जाताना रेल्वेतून दारूची वाहतूक करू शकत नाहीत, किंवा तुमच्यासोबत दारू घेऊन जाऊ शकत नाहीत. उदाहरणार्थ बिहार, गुजरात, नागालँड आणि मिझोरम हे राज्य ड्राय राज्य म्हणून ओळखले जातात. या राज्यांमध्ये सर्व प्रकारची दारू बंद आहे, अशा राज्यांमध्ये तुम्ही दारू घेऊन जाऊ शकत नाहीत.
पकडला तर किती दंड
तुमच्याकडे जर प्रमाणात दारू असेल तर तुम्हाला कोणतीही समस्या येणार नाही, मात्र त्यासाठी देखील तुम्हाला परवाना दाखवावा लागेल. मात्र जर तुमच्याकडे एका विशिष्ट लिमिटपेक्षा जास्त दारूचा साठा सापडला तर मात्र तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो. तुम्हाला 5000 हजार रुपयांपासून ते 25000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. एवढंच नाही जर तुम्ही एखाद्या ड्राय स्टेटमध्ये दारू घेऊन गेलात तर तुम्हाला दंडासोबतच शिक्षा देखील होऊ शकते.