CDS Rawat Helicopter crash: सीडीएस बिपीन रावतांच्या हेलिकॉप्टरचा अपघात खराब हवामानामुळे, IAF चा अहवाल

IAF ने म्हटले आहे की 8 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या Mi-17 V5 हेलिकॉप्टर अपघाताच्या तपासात फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरचे विश्लेषण करण्यात आले.

CDS Rawat Helicopter crash: सीडीएस बिपीन रावतांच्या हेलिकॉप्टरचा अपघात खराब हवामानामुळे, IAF चा अहवाल
बिपीन रावत

काही दिवसांपूर्वीच सीडीएस बिपीन रावत (CDS Rawat)  यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला, त्यात त्यांचा मृत्यू झाला. हेलिकॉप्टर अपघाताचे कारण आता समोर आले आहे. IAF ने म्हटले आहे की 8 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या Mi-17 V5 हेलिकॉप्टर (Helicopter crash) अपघाताच्या तपासात फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरचे विश्लेषण करण्यात आले. हेलिकॉप्टर दुर्घटनेमागे यांत्रिक बिघाड, तोडफोड किंवा निष्काळजीपणा हे कारण नसल्याचे त्यात म्हटले आहे. प्राथमिक अहवालानुसार, खोऱ्यातील हवामानात अनपेक्षित बदल झाला, त्यामुळे हेलिकॉप्टर ढगांमध्ये अडकले आणि कोसळले. ढगांमुळे वैमानिक गोंधळला आणि हेलिकॉप्टर नियंत्रणाबाहेर जाऊन जमिनीवर आदळले.

तपास पथकाने काय तपास केला?

अपघाताचे संभाव्य कारण शोधण्यासाठी तपास पथकाने सर्व उपलब्ध साक्षीदारांची तपासणी केली. याशिवाय फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरचे विश्लेषण करण्यात आले. त्याच्या निष्कर्षांवर आधारित, कोर्ट ऑफ इन्क्वायरीने काही शिफारसी केल्या आहेत ज्यांचे पुनरावलोकन केले जात आहे. एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने अपघाताचे अधिकृत कारण दिले आहे. 5 जानेवारी रोजी त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना तपासातील माहिती दिली होती. त्यात तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये कोसळलेले हेलिकॉप्टर पूर्णपणे पायलटच्या नियंत्रणाखाली असल्याचे सांगण्यात आले आहे. पण ढगांमुळे ते त्याच्या ताब्यात असतानाही कोसळले. यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशननुसार, अशा अपघातांमध्ये पायलट किंवा क्रू मेंबर्सना धोक्याची कल्पना नसते.

8 डिसेंबर रोजी सीडीएस रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर 12 लष्करी कर्मचारी हेलिकॉप्टरमध्ये चढले. हेलिकॉप्टर पोहोचण्याच्या काही मिनिटांपूर्वीच सुलूर एअरबेस कंट्रोल रूमचा हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला. यानंतर हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली.

घातपाताचा मोठा कट उधळला! दिल्लीत बॅगमध्ये आढळलेल्या आयईडी बॉम्बचा खरा सूत्रधार कोण?

Budget 2022 Date : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर, 1 फेब्रुवारीला बजेट सादर होणार

Kamal Khan: शब्दांचा जादूगार अन् मन जिंकणारा अवलिया; कमाल खान यांच्या निधनावर पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

Published On - 7:28 pm, Fri, 14 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI