
TV9 ग्रुपचे MD आणि CEO बरुण दास यांनी TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी TV9 ग्रुपचे संचालक हेमंत शर्मा तसेच कर्मचारी उपस्थित होते.
पहिल्या दिवशी झालेल्या या दिमाखदार कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी केंद्रीय मंत्री महेंद्रनाथ पांडे, भाजप खासदार, भोजपुरी कलाकार मनोज तिवारी आणि दिल्लीचे मंत्री आतिशी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते या महोत्सवात सहभागी झाले होते. त्यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.
TV9 नेटवर्कने TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये एक प्रदर्शनही आयोजित केले आहे. अनेक प्रकारची खास स्टॉल उभारण्यात आली आहेत. लोकांसाठी अनेक प्रकारच्या वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत.