AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मोदी सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, युद्ध भडकताच थेट आदेश, इथेनॉल पेट्रोलवर..

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध भडकले आहे. यादरम्यानच केंद्र सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेतला. इथेनॉल असलेल्या पेट्रोलबाबत हा निर्णय घेण्यात आला. नुकताच याबाबत सरकारने आदेश जारी केली आहेत.

मोठी बातमी! मोदी सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, युद्ध भडकताच थेट आदेश, इथेनॉल पेट्रोलवर..
Ethanol blended petrol
| Updated on: Jun 11, 2026 | 9:58 AM
Share

केंद्र सरकारने नुकताच एक अत्यंत मोठा निर्णय घेतला. इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात भारतावर परिणाम होत आहेत. यादरम्यानच केंद्र सरकारकडून विविध पाऊले उचलली जात आहेत. सरकारने नुकताच एक अधिसूचना जारी केली. त्यानुसार, सरकारने अधिक इथेनॉलचे प्रमाण असलेल्या पेट्रोलवर उत्पादन शुल्कात मोठी सलवत जाहीर केली. हा अत्यंत मोठा निर्णय म्हणावा लागेल. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील सध्याच्या ‘E20’ मानकापेक्षा जास्त इथेनॉलचे प्रमाण असलेल्या पेट्रोलला आर्थिक आधार मिळेल. इराण आणि अमेरिका युद्धात पेट्रोलचा मोठा तुटवडा आहे. सध्याची परिस्थिती बघता सध्याच काही युद्ध थांबण्याचे संकेत अजिबात नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारकडून अशाप्रकारची पाऊले उचलली जात आहेत. अधिसूचनेत नमूद केल्यानुसार, 22% ते 30% दरम्यान इथेनॉल असलेल्या पेट्रोलवर कोणतेही उत्पादन शुल्क आकारले जाणार नाही.

पेट्रोलमध्ये मिसळलेल्या इथेनॉलच्या प्रमाणानुसार, E22, E25, E27 आणि E30 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिश्रणांना ही सवलत लागू असेल. हा मोदी सरकारचा मोठा निर्णय आहे. गेल्या काही दिवसात चाैथ्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली. आता पुन्हा इराण आणि अमेरिका यांच्चात तणाव वाढला. या परिस्थितीमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातोय.

भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा तेल आयातदार देश आहे. भारत तेलाच्या बाबतीत इतर देशांवर अवलंबून आहे. इतर देशांच्या आयातीवर कमी अवलंबून राहण्याकरिता सरकारकडून धोरणात्मक निर्णय घेतली जात आहेत. त्याचाच हा मोठा भाग असून इथेनॉल मिश्रणाला चालना देण्याकरिता हा निर्णय घेण्यात आला.

‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स’ने (BIS) E20 पेक्षा अधिक इथेनॉल-पेट्रोल मिश्रणांसाठी इंधनाच्या गुणवत्तेचे निकष निश्चित केल्यानंतर उत्पादन शुल्कात हा बदल करण्यात आला. इथेनॉल असलेल्या पेट्रोलवर कोणतेही उत्पादन शुल्क आकारले जाणार नाही, ज्यामुळे आता अधिक स्वस्तही होऊ शकणार आहे. इराण आणि अमेरिका युद्धात फक्त पेट्रोल आणि डिझेलचीच समस्या नाही तर एलपीजी गॅसचीही समस्या आहे. एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...