
Chandrayaan-3: ऑगस्ट 2023 मध्ये चंद्रयान-3 च्या लँडर विक्रमने सॉफ्ट लॅडिंग केली होती. त्यानंतर अंतराळाच्या इतिहासात नवीन आध्याय जोडला गेला होता. या मिशनमध्ये भारतीय अंतराळ संस्था (इस्त्रो) वैज्ञानिकांना एका नवीन आव्हानांचा सामना करावा लागला होता. विक्रमकडे अजून काही प्रोपेलेंट शिल्लक होते. त्यावेळी इस्त्रोमधील काही शास्त्रज्ञांचे मत होते की ते असेच वाया जाऊ नये. त्याच वेळी काही शास्त्रज्ञ म्हणत होते, अभियान आधीच यशस्वी झाले आहे आणि आता कोणत्याही अतिरिक्त प्रयोगांची गरज नाही. यामुळे मोठी दुविधा निर्माण झाली.
शेवटी इस्त्रोने आपल्या योजनेत बदल केला. चंद्रावर विक्रम लँडरचा अप्रत्याशित ‘हॉप’ (उडी मारणे) प्रयोग करण्यात आला. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून 40 सेंटीमीटर वर उठाला. त्यानंतर जवळपास 30-40 सेंटीमीटर लांब जावून लँड झाला. विक्रम लँडरने मारल्या या उडीमुळे इस्त्रोचा वैज्ञानिकांना सुखद धक्का बसला. तसेच भविष्यासाठी चांगले संकेत मिळाले.
इस्त्रो प्रमुख व्ही. नारायणन हे सुद्धा त्यावेळी चंद्रयान-3 मिशनमधील प्रमुख वैज्ञानिकांमध्ये होते. त्यांनी त्या दिवशाची आठवण करताना सांगितले की, लँडीगच्या दिवशी खूप तणाव होता. परंतु प्रोपेलेंट प्राणालीने पूर्ण काम केले. त्यानंतर चंद्रयान-3 चे लँडींग झाले. हे मिशनचे मोठे यश होते. विशेष प्रोपेलेंटचा वापर करण्यासाठी त्यांनी इस्त्रोचे माजी अध्यक्ष एस सोमनाथ यांच्यासोबत चर्चा केली होती. परंतु त्यावेळी मिशनमध्ये सहभागी काही शास्त्रज्ञांनी या प्रयोगात रुची दाखवली आहे. त्यांचे म्हणणे होते, विक्रमची चंद्रावर सॉफ्ट लँडींग झाली आहे. त्यामुळे मिशन पूर्ण झाले आहे. अहमदाबादमधील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीमधील व्याख्यानात बोलताना नारायणन यांनी ही आठवण सांगितली.
वैज्ञानिकांमध्ये दीर्घ चर्चा झाली. त्यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये विक्रम इंजिनात राहिलेल्या इंधनाने त्याला पुन्हा ‘हॉप’ करण्यात आले. या प्रक्रियेत लँडरचे इंजिन आपण सुरु करु शकतो, या क्षमतेचे प्रदर्शन इस्त्रोने केले. ही क्षमता भविष्यातील मिशनसाठी खूप महत्वाची ठरणार आहे. त्यात पृथ्वीवर परतण्याचा प्रवासाचाही समावेश असू शकतो. विक्रमचे यशस्वी ‘हॉप’ प्रयोग सर्वांसाठी आश्चर्यकारक आहे. कारण यापूर्वी कधी इस्त्रोकडून त्याचा खुलासा करण्यात आला नाही. तसेच हा प्रयोग मिशनचा भागसुद्धा नव्हता.