चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली PM मोदींची घेतली भेट, चीन-भारत संबंधांवर झाली चर्चा

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली PM मोदींची घेतली भेट, चीन-भारत संबंधांवर झाली चर्चा
pm-modi-wang-1
| Updated on: Aug 19, 2025 | 10:24 PM

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी वांग यी यांनी पंतप्रधान मोदींना शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेच्या अजेंडाची आणि चीन-भारत संबंधांमध्ये झालेल्या प्रगतीची माहिती दिली. त्यात बरोबर दोन्ही नेत्यांमध्ये इतरही अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारत आणि अमेरिकेमधील संबंध बिघडले आहेत, त्यानंतर आता चीन आणि भारताचे संबंध सुधारण्यास सुरुवात झाली आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी काल (सोमवार) भारतात आले आहेत. पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वी त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी 6.30 वाजता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

पंतप्रधान मोदींनी दिली माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वांग यी यांच्या भेटीची माहिती देताना X वर लिहिले की, ‘परराष्ट्र मंत्री वांग यी यांना भेटून आनंद झाला. गेल्या वर्षी कझानमध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या भेटीपासून, भारत-चीन संबंध एकमेकांच्या हितसंबंधांचा आदर करून प्रगती करत आहेत. शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेदरम्यान टियांजिनमध्ये होणाऱ्या आमच्या पुढील बैठकीची मी वाट पाहत आहे. भारत आणि चीनमधील स्थिर, विश्वासू आणि रचनात्मक संबंध प्रादेशिक आणि जागतिक शांततेसाठी आणि समृद्धीसाठी महत्त्वाचे ठरतील.’

पंतप्रधान मोदी चीनला जाणार

वांग यी यांनी तियानजिन येथे होणाऱ्या एससीओ शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण दिले. त्यामुळे शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी चीनला जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान चीनला भेट देऊ शकतात. हा दौरा दोन्ही देशांसाठी महत्वाचा असणार आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याची ऑफर

भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण संबंध आहेत. अशातच आता चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी चीन भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. ची दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध आणि त्यांच्या समस्या सोडवण्यात सकारात्मक भूमिका बजावू शकतो असं वांग यी यांनी म्हटलं आहे.