AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

J-10C Vs Brahmos : ऑपरेशन सिंदूरनंतर चीनचं J-10C vs ब्रह्मोस मिसाइल, निर्यातीच्या स्पर्धेत कोणी मारली बाजी

J-10C Vs Brahmos : J-10C च्या बाबतीत चीनने जो प्रचार चालवलाय तो तितका खरा नाहीय. पाकिस्तानचं या फायटर जेटचा पक्का ग्राहक आहे. 2022 पासून पाकिस्तानने आतापर्यंत 36 J-10C फायटर विमानांचा आपल्या ताफ्यात समावेश केला आहे.

J-10C Vs Brahmos :  ऑपरेशन सिंदूरनंतर चीनचं J-10C vs ब्रह्मोस मिसाइल, निर्यातीच्या स्पर्धेत कोणी मारली बाजी
J-10C Vs Brahmos
| Updated on: Aug 03, 2026 | 3:21 PM
Share

मागच्यावर्षी मे महिन्यात भारत-पाकिस्तानामध्ये सैन्य संघर्ष झाला होता. चार दिवस दोन्ही देशांमध्ये युद्ध झालं. या सैन्य संघर्षानंतर संरक्षण बाजारपेठेत दोन शस्त्रांची सर्वाधिक चर्चा आहे. चीनचं J-10C फायटर जेट आणि भारताचं ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइल. पाकिस्तानने J-10C ने भारताचं राफेल फायटर विमान पाडल्याचा दावा केला होता. त्यानंतर चीनने या विमानाचं मार्केटिंग करुन एक्सपोर्ट वाढवण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे भारताने आपल्या ब्रह्मोस मिसाइलने पाकिस्तानला चांगलचं धोपटून काढलं. ऑपरेशन सिंदूरनंतर ब्रह्मोसचं सुद्धा चांगलचं मार्केटिंग झालं. फिलीपींससह अन्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणात ब्रह्मोसची निर्यात सुरु आहे. आता दक्षिण पूर्व आशियाई देशांपासून आखाती देशांमध्ये ब्रह्मोसची मागणी वाढत चालली आहे. पण मुख्य प्रश्न हा आहे की, मागच्यावर्षभरात कोणाला जास्त खरेदीदार मिळाले? दोन्ही शस्त्रांच्या किंमतीत काय फरक आहे? टेक्नोलॉजीच्या आधारावर कोणामध्ये किती फरक आहे?

J-10C च्या बाबतीत चीनने जो प्रचार चालवलाय तो तितका खरा नाहीय. पाकिस्तानचं या फायटर जेटचा पक्का ग्राहक आहे. 2022 पासून पाकिस्तानने आतापर्यंत 36 J-10C फायटर विमानांचा आपल्या ताफ्यात समावेश केला आहे. इंडोनेशियाने ऑक्टोंबर 2025 मध्ये 42 फायटर जेटसाठी 9 अब्ज डॉलरच्या डीलची घोषणा केली. पण डिलीवरीची कालमर्यादा अजून निश्चित झालेली नाही. बांग्लादेशने याच 20 जेट विमानांसाठी 2.2 अब्ज डॉलरच्या डीलवर चर्चा सुरु केली आहे. डिसेंबर 2025 च्या रिपोर्टमध्ये युरोफायटर टायफूनकडे पण बांग्लादेशचा कल असल्याचं दिसलं. अजून हा सौदा अंधातरी आहे. इजिप्त, उज्बेकिस्तान, ब्राझील आणि इराण या देशांनी J-10C मध्ये इंटरेस्ट तर दाखवला, पण पक्की ऑर्डर दिलेली नाही.

ब्रह्मोसच्या खरेदीत किती देशांना इंटरेस्ट?

ब्रह्मोसच्या बाबतीत चित्र एकदम या उलट आहे. फिलीपींसने 2022 मध्ये 37.5 कोटी डॉलरची डील साइन केली होती. 2024 पासून मिसाइलची डिलीवरी सुरु झाली. मार्च 2026 मध्ये इंडोनेशियाने ब्रह्मोस खरेदी करण्याची औपचारिक घोषणा केली. मे 2026 मध्ये वियतनाम सोबत 62 कोटी डॉलरचा सौदा फायनल केला. वियतमान ही मिसाइल खरेदी करणारा दक्षिण पूर्व आशियातील तिसरा देश ठरला आहे. इतकचं नाही, यूएई, थायलंड, चिली, मलेशिया आणि दक्षिण आफ्रिकेसह 14 पेक्षा जास्त देशांनी ब्रह्मोसच्या खरेदीत रस दाखवला आहे.

विकण्यासाठी भारत किंमतीमध्ये तडजोड करतोय का?

4 ते 5 कोटी डॉलर एका J-10C फायटर जेटची किंमत आहे. इंडोनेशियासोबत जी डील झालीय त्यानुसार शस्त्रास्त्र, ट्रेनिंग आणि सपोर्ट सिस्टिम जोडून ही किंमत प्रति जेट 21 कोटी डॉलर होते. बांग्लादेशसोबत डीलचा हाच आकडा 11 कोटी डॉलर प्रतिजेट आहे. ब्रह्मोसची किंमत वेगवेगळ्या पद्धतीने निश्चित होते. कारण फक्त एकच मिसाइल नाही, तर सिस्टम लॉन्चर, कमांड सेंटर आणि मिसाइल हे पॅकेज बनवून विकलं जातं. म्हणून प्रति यूनिटची किंमत सांगता येणार नाही. फिलीपींससोबत संपूर्ण पॅकेज 37.5 कोटी डॉलरचं आहे. वियतनामचा सौदा 62 कोटी डॉलरमध्ये निश्चित झाला. चीन J-10C साठी कमी किंमतीत ग्राहक जमवत असताना भारत ब्रह्मोस किंमतीच्या बाबतीत कुठलीही तडजोड न करता आपली वस्तू विकत आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी