CJP Protest : FRS च्या खुलाशानंतर CJP चे लोक खवळले, पोलिसांना उलट चॅलेंज, मग ‘आम्ही सुद्धा लाठ्या चालवणाऱ्या..’
CJP Protest : दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत फेशियल रिकग्निशन सिस्टिमच्या (FRS) मदतीने आतापर्यंत 2500 पेक्षा जास्त क्रिमिनल बॅकग्राउंड असलेल्या लोकांची ओळख पटवली आहे. यावर आता कॉकरोच जनता पार्टीने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर-मंतरवर प्रदर्शन सुरु आहे. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत फेशियल रिकग्निशन सिस्टिमच्या (FRS) मदतीने आतापर्यंत 2500 पेक्षा जास्त क्रिमिनल बॅकग्राउंड असलेल्या लोकांची ओळख पटवली आहे. यावर आता कॉकरोच जनता पार्टीने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यांनुसार, असे लोक गर्दीत घुसून पोलिसांना लक्ष्य करत होते. या प्रकरणात आतापर्यंत 15 FIR नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांच्या सांगण्यानुसार हे कॅमेरे सर्वसामान्य आंदोलकांसाठी नाहीत, तर फरार आरोपी, गुन्हेगार आणि सराईत गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी आहेत.
पोलीस दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलन स्थळाचं मुख्य प्रवेशद्वार आणि निघण्याची जागा या चार ठिकाणी FRS यूनिट बसवण्यात आले आहेत. हे सर्व युनिट्स दिल्ली पोलिसांच्या डेटाबेसशी जोडलेले आहेत. ही सिस्टिमवर पोलीस अधिकारी सतत लक्ष ठेऊन आहेत. या सिस्टिमद्वारे कुठलाही फरार गुन्हेगार आणि सराईत गुन्हेगाराची लगेच ओळख पटवता येते. त्यांचा रेकॉर्ड आधीपासूनच पोलिसांकडे उपलब्ध आहे.
FRS मुळे किती झटपट होतं काम?
यावर कॉकरोच जनता पार्टीचा प्रवक्ता आशुतोष रांका मीडियाशी बोलताना म्हणाला की, “आम्ही सुद्धा लाठ्या चालवणाऱ्या पोलिसांची लिस्ट जारी करु. लोकांनाही ते हिंसक पोलीस समजतील” FRS मधील हाय रेजोल्यूशन कॅमेऱ्यामध्ये लांब उभ्या असलेल्या चेहऱ्यांची सुद्धा ओळख पटवता येते असं दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. काही सेकंदात दिल्ली पोलिसांकडे असलेल्या डेटाबेसशी मॅच करुन आरोपीची ओळख पटवली जाते. कुठलाही फरार आरोपी दिसला तर लगेच संबंधित पोलीस यूनिटला कळवलं जातं. जेणेकरुन कायदेशीर कारवाईत विलंब होऊ नये.
पहिल्यांदा FRS सिस्टिमचा वापर होतोय का?
जे वारंवार गुन्हे करुन दिल्ली पोलिसांच्या बॅर कॅरेक्टरच्या लिस्टमध्ये असलेल्या सराईत गुन्हेगारांची सुद्धा ही सिस्टिम ओळख पटवते. FRS सिस्टिमच्या तैनातीचा उद्देश गुन्हे रोखणं आणि तपास दोन्ही आहे. असामाजिक तत्वांची लगेच ओळख पटवणं आणि सामान्य आंदोलकांना काही त्रास होऊ नये हा त्यामागे उद्देश आहे. दिल्ली पोलिसांकडून पहिल्यांदा FRS सिस्टिमचा वापर होत नाहीय. याआधी प्रजासत्ताक दिन, स्वतंत्रता दिवस, होळी, दिवाळी, ईद आणि रामलीला या प्रसंगी सुद्धआ FRS सिस्टिमचा वापर करण्यात आला आहे.