CJP Jantar Mantar Protest: सीजेपी आंदोलनातील मोठी बातमी, यूट्यूबर ध्रुव राठी ताब्यात, नेमकं घडलं काय?

Youtuber Dhruv Rathee Detained in Gurugram: सीजेपी आंदोलनापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. युट्यूबर ध्रुव राठी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर ताज्या अपडेटनुसार, आतापर्यंत 500 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

CJP Jantar Mantar Protest: सीजेपी आंदोलनातील मोठी बातमी, यूट्यूबर ध्रुव राठी ताब्यात, नेमकं घडलं काय?
युट्यूबर ध्रुव राठी याला पोलिसांनी घेतले ताब्यात
| Updated on: Oct 10, 2026 | 10:34 AM

Youtuber Dhruv Rathee Detained in Gurugram: सीजेपी आंदोलनात एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. जर्मनीहून या आंदोलनासाठी खास आलेला युट्यूबर ध्रुव राठी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरूग्राममधील त्यांच्या घरातून दिल्ली पोलिसांनी सकाळी 8 वाजता ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. तर ताज्या माहितीनुसार, आतापर्यंत 500 हून आंदोलकांना पोलिसांनी विविध ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे. दिल्लीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.

गुरूग्राममध्ये नेमकं काय घडलं?

Loading...

प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी यांना गुरूग्राममधील त्यांच्या राहत्या घरातून दिल्ली पोलिसांनी उचलले. सकाळी 8 वाजता त्यांना ताब्यात घेण्यात आले. सकाळी साध्या वेशातील 50 पोलीस त्यांच्या निवासस्थानी धडकले. गुरुग्राममधील सेक्टर-46 मध्ये त्यांचे घर आहे. केद्रींय विहार येथील घरी पोलीस पोहचले. ध्रुव राठींच्या आईने दरवाजा उघडताच पोलीस घरात दाखल झाले. त्यांना ताब्यात घेतले. त्यांना नेमक्या कोणत्या कारणासाठी ताब्यात घेतले हे समोर आलेले नाही. सीजेपी फॉर इंडिया या एक्स हँडलवरून ही माहिती समोर आली आहे. पोलिसांचे हे पथक रात्रीपासूनच त्यांच्या घराबाहेर असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे.

अभिजीत दिपकेंसह इतर नेत्यांना ताब्यात घेणार

दिल्ली विमानतळावर अभिजीत दिपके यांना ताब्यात घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. दिपके हे सकाळीच कॉकरोच जनता पार्टीच्या सदस्यांसोबत दिल्लीसाठी मुंबई विमानतळावरून रवाना झाले. ते अगदी थोड्याच वेळात दिल्लीत पोहचतील. त्यांच्यासह सहकाऱ्यांना ताब्यात घेणार आहे. तर आशुतोष रांका आणि सौरव दास यांनाही लवकरच ताब्यात घेण्यात येणार आहे. या आंदोलनाची हवा काढून घेण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहे. पण नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर हे आंदोलन होणार की नाही असा सवालही उपस्थित होत आहे. आज दिवसभराच्या घडामोडींकडे देशाचे लक्ष लागले आहे.

बंगळुरू येथील आंदोलनात ध्रुव राठी

गुरूवारी बंगळुरू येथे SIR विरोधात झालेल्या आंदोलनात ध्रुव राठी सहभागी झाला होता. तर दिल्ली येथील आजच्या जंतर मंतर येथील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करणारी पोस्टही त्याने सोशल मीडियावर शेअर केली होती. हे आंदोलन रोखण्यासाठी केंद्र सरकारने आंदोलकांना ताब्यात घेण्याचे सत्र सुरू केलेले आहे. ताज्या अपडेटनुसार, रत्ना सिंह यांना ताब्यात घेतल्याचा सीजेपीने दावा केला आहे. तर दीपके हे दिल्ली विमानतळावर आताच दाखल झाले आहेत. त्यांना ताब्यात घेण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us