केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांचे मेसेज आले, सीजेपीच्या नेत्याचा खळबळजनक दावा, राजकारणात भूकंप, थेट..

कॉकरोच जनता पार्टीने नीट पेपरफुटीत मोठे आंदोलन पुकारले. या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला. या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यातच आता मोठा खुलासा करण्यात आला.

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांचे मेसेज आले, सीजेपीच्या नेत्याचा खळबळजनक दावा, राजकारणात भूकंप, थेट..
CJP leader
| Updated on: Nov 24, 2026 | 8:51 AM

कॉकरोच जनता पार्टीने जंतर मंतरवर मोठे आंदोलन पुकारले. त्यांच्या या आंदोलनाला यश मिळाले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान सीजेपीच्या या आंदोलनानंतर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. देशभरात विद्यार्थी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरले होते. भाजपाच्या सत्तेमधील हा पहिला राजीनामा ठरला. विरोधकांचे बळ या आंदोलनाला असल्याचा आरोप भाजपाने केला. राहुल गांधी यांच्यासह अन्य विरोधी पक्षातील नेत्यांनी या आंदोलनाला भेट दिली. अभिजीत दिपके अमेरिकेतून भारतात दाखल झाले आणि त्यांनी हे आंदोलन पुकारले.या आंदोलनात त्यांना मोठे यश मिळेल. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन सीजेपीने पुकारले. त्यांनी जंतर मंतरवर आंदोलन करण्यास सुरूवात केली. मात्र, पोलिसांनी त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवले.

त्यांच्याकडून काही बॉन्डवर सह्या करून घेतल्या. हेच नाही तर परवानगी नसताना जंतर मंतरवर गेल्याने साैरभ दास आणि आशुतोष रांका यांना काही दिवस जेलमध्येही राहवे लागले. आता कुठेतरी सीजेपी शांत झाल्याचे दिसत आहे. त्यातच आता आशुतोष रांका यांनी शाळेच्या दाैऱ्यानंतर पुन्हा एकदा भाजपावर जोरदार निशाणा साधला. त्यांनी यावेळी कॉंग्रेसचे काैतुक केले आणि कर्नाटक सरकारबद्दल भाष्य केले.

Loading...

भाजपाची मानसिकता आहे की, त्यांना कोणीही प्रश्न विचारू नये. जेनझीं भाजपाला आता सहन करणार नसल्याचीही मोठे विधान त्यांनी केले. यादरम्यानच आशुतोष रांका यांनी गंभीर आरोप केले. आशुतोष रांका यांनी म्हटले की, आशुतोष रांकाला विचारण्यात आले की, भाजपा नेत्यांच्या घरातून तुमच्या लढ्याला पाठिंबा मिळत आहे खरे आहे का?

यावर बोलताना आशुतोष रांका याने म्हटले की,जंतर मंतरवर आंदोलन सुरू होते, त्यावेळी अनेक लोक आम्हाला भेटण्यासाठी येत होती. ते मागे येत पुढे स्टेजवर येत नव्हते. कारण ते लोक भाजपाचे होते. केंद्रीय मंत्र्यांची मुले त्यांनीही आम्हाला मेसेज करून आमचा तुम्हाला सपोर्ट असल्याचे म्हटले. हेच नाही तर आम्ही तुमच्यासोबत असल्याचे केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांनी स्वत: म्हटले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us