AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाफिंग बॉयची अजून एक कमाल, ट्रक क्लिनर ते कंटेंट क्रिएटर, अजून एक मोठी झेप, सोशल मीडियावर ट्रेडिंग अरूणची प्रेरणादायी कहाणी

Truck Cleaner Arun Kumar Social Media Laughing Boy: सोशल मीडियावरील अनेक कॉमेडी, विडंबनात्मक रील्स, व्हिडिओच्या अखेरीस नाना पाटेकर अथवा हा लाफिंग बॉय असतोच. आता त्याने अजून एक कमाल करून दाखवली आहे.

लाफिंग बॉयची अजून एक कमाल, ट्रक क्लिनर ते कंटेंट क्रिएटर, अजून एक मोठी झेप, सोशल मीडियावर ट्रेडिंग अरूणची प्रेरणादायी कहाणी
ट्रक क्लिनर ते लाफिंग बॉय, ट्रेडिंग अरूणची प्रेरणादायी कहाणी
| Updated on: Nov 24, 2026 | 8:23 AM
Share

Truck Cleaner Arun Kumar Social Media Laughing Boy: सोशल मीडियावर रोज विंडबनात्मक रील्स, व्हिडिओचा महापूर येतो. पण या रील्सच्या अखेरीस एकतर नाना पाटेकर दिसतात अथवा भारतातील लाफिंग बॉय हमखास दिसतो. बरं केवळ भारतातीलच नाही तर पाकिस्तान आणि युरोपातीलही काही रील्सच्या अखेरीस हा हसवणारा मुलगा हमखास दिसतो. तुम्हाला खळखळून हसवणारा हा मुलगा इतक्यांदा व्हायरल झाला आहे तो सोशल मीडिया सेन्सेशन ठरला आहे. तो कायम ट्रेंडिंगमध्ये असतो. या मुलाचे नाव अरूण कुमार असे आहे. गरिबीमुळे चौथीनंतरच त्याने शाळेला रामराम ठोकला. त्यानंतर ट्रकवर तो क्लिनर म्हणून काम करू लागला. पण आता त्याने शिक्षणात एक मोठा टप्पा गाठला आहे. इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याने आयुष्याची नवीन सुरूवात केली आहे. त्याचा या प्रवासात ट्रक चालकाचे मोठे योगदान आहे.

१० व्या वर्षीच सोडावी लागली शाळा

जगाला खळखळून हसवणाऱ्या अरूण कुमारचे आयुष्य मात्र खूप खडतर होते. वयाच्या १० व्या वर्षीच गरिबी आणि घरच्या परिस्थितीमुळे त्याला शिक्षण सोडावे लागले. त्याने कुटुंबाला हातभार लावण्यासाठी पडेल ती कामं करण्यास सुरूवात केली. तो नेहरू नावाच्या एका ट्रक ड्रायव्हरसोबत क्लिनर म्हणून काम करू लागला. ट्रकमध्येच त्याचे बालपण गेले. याच दरम्यान एके दिवशी चहाच्या टपरीवर ब्रेकच्या वेळी नेहरू यांनी त्याचा तो सर्वाधिक व्हायरल झालेला व्हिडिओ शूट केला. त्यात चहाचा कप हाती असलेला अरूण बिनधास्त खळखळून हसताना दिसतो. हसत खेळत काढलेला हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर टाकला आणि आज तो अनेक व्हिडिओमध्ये खऱ्या अर्थाने जान टाकतो. त्या व्हिडिओला तडका देतो. तेव्हापासून अरूण कुमार इंटरनेटवर सर्वांचा लाडका बनला. तो लोकप्रिय ठरला. पण त्याचे कष्ट संपले नाही.

ट्रकची केबिनच क्लासरूम

अरूणची लोकप्रियता पाहून ट्रक चालक नेहरू यांनी त्याला मदत करण्याचे ठरवले. सोशल मीडियावर अरूणच्या व्हिडिओवर लोक कमेंट करत, पण त्याच त्याला वाचता येत नव्हत्या. त्याचे शिक्षण अर्धवट राहिल्याने अडचण येत होती. ही गोष्ट नेहरू यांनी हेरली आणि सोशल मीडियावर ज्यांनी त्याला ओळख मिळवून दिली, त्याच नेहरूंनी त्याच्या शिक्षणाचा मार्ग खुला केला. त्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणले. ट्रकच्या केबिनमधूनच त्याच्या शिक्षणाचा प्रवास सुरू झाला.

नेहरूंनी घेतली शिक्षणाची जबाबदारी

ट्रक चालक नेहरू यांनी अरूणच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. त्यांनी त्याच्यासाठी पुस्तकं विकत घेतली. परीक्षा शुल्क भरले. इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी करून घेतली. त्याची अरूणला मोठी मदत झाली. प्रवासादरम्यान नेहरू यांनी त्याचा अभ्यासही करून घेतला. अखेर त्यांच्या मेहनतीला फळ आले. मार्च २०२६ मध्ये अरूण इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला. आता सोशल मीडियावरील कंटेंट क्रिएटरसाठीचे इतर कौशल्य तो आत्मसात करत आहे. अनेक तरुण-तरुणींसाठी अरूणची कहाणी प्रेरणादायी ठरत आहे.

Follow Us
व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा..
WhatsApp Web : व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा काय?
घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..; दरेकरांचा रोहित....
Pravin Darekar on Rohit Pawar : घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..;  दरेकरांचा रोहित पवारांना खोचक टोला
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ