AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणात मोठा उलटफेर होणार? आगामी लोकसभा निवडणुकीआधी रामदास आठवलेंकडून महत्वाचे संकेत, शरद पवारांवरही…

राज्याच्या राजकारणात मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीआधी रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर दिली आहे.

राजकारणात मोठा उलटफेर होणार? आगामी लोकसभा निवडणुकीआधी रामदास आठवलेंकडून महत्वाचे संकेत, शरद पवारांवरही...
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 24, 2026 | 8:16 AM
Share

जगासहित देशातील बदलत्या अर्थव्यवस्थेमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विविध मागण्यांसाठी  विद्यार्थी, शेतकरी आंदोलक रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातूनही सरकारच्या विरोधात तरुणांचा असंतोष पाहायला मिळाला आहे. या बदलत्या राजकीय घडामोडीदरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी मोठं भाष्य करत खळबळ उडवून दिली आहे. यावेळी रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर दिली आहे. त्यासहित शरद पवारांवरही महत्वाचं भाष्य केलं.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले धाराशिवच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान आठवलेंनी माध्यमांशी संवाद साधला. या दौऱ्यादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, 2029 च्या निवडणुकीपूर्वी रिपब्लिकन पार्टी आणि प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष एकत्र येऊ शकतो. मात्र प्रकाश आंबेडकर यांना रिपब्लिकन ऐक्य मान्य नाही. प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आल्याशिवाय आंबेडकरी कार्यकर्त्यांना न्याय मिळणार नाही. प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्षपद स्वीकारावे. रिपब्लिकन पक्षाचे छोटे-मोठे गट एकत्र करून एकच पक्ष निर्माण केला पाहिजे. मंत्रिपदापेक्षा आंबेडकरी समाजाचे एकत्रीकरण माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.  2019 मध्ये प्रकाश आंबेडकर हे सोबत असते, तर काँग्रेससोबत मिळून मोठ्या प्रमाणात सत्तेत सहभागी होता आले असते’.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर रामदास आठवले म्हणाले, ‘अजित पवार हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या असत्या. शरद पवार एनडीएसोबत यायला तयार नाहीत. 2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते, तर देशाचे राष्ट्रपती झाले असते. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय चांगला आहे.  खासदार फोडण्यासाठी १५० कोटी रुपये दिले जात असल्याचा संजय राऊतांचा आरोप खोटा असल्याचे आठवलेंनी म्हटलं.  आमच्याकडे खासदारांना द्यायला १५० कोटी रुपये नाहीत. उलट खासदारच आमच्याकडे येत आहेत, असा मिश्किल टोला आठवलेंनी लगावला.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका करताना आठवले म्हणाले, ‘सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील सावरकरांबाबतच्या मुद्द्यांशी मतभेद आहेत. तर राहुल गांधी यांची भूमिका लोकशाहीसाठी घातक आहे. परदेशात जाऊन राहुल गांधी देशाची बदनामी करतात. विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी आपली भूमिका योग्य पद्धतीने पार पाडत  नाहीये’. तर दुष्काळजन्य परिस्थितीवर आठवले म्हणाले, ‘महाराष्ट्रातील दुष्काळासाठी केंद्र सरकारचे पॅकेज लवकरच जाहीर होईल.दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी उद्योगपतींनीही पुढे येण्याची गरज आहे’.

Follow Us
घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..; दरेकरांचा रोहित....
Pravin Darekar on Rohit Pawar : घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..;  दरेकरांचा रोहित पवारांना खोचक टोला
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल