केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वाढवले भाजपाचे टेन्शन, केली ही मोठी मागणी
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2027 साठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपाकडून 10 जागा देण्याची मागणी केली आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकांची जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच केंद्रिय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपाचे टेन्शन वाढवले आहे. रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून आरपीआय ( ए) साठी १० जागांची मागणी केली आहे. तसेच रामदास आठवले यांनी भाजपाला इशारा दिला आहे की जर आम्हाला जागा दिल्या नाही तर पार्टी एकट्याच्या बळावर २०० जागांवर निवडणूक लढवले असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
लखनऊ येथे पत्रकारांशी बोलताना केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एनडीए आघाडीकडे दहा जागांची मागणी केली आहे. आरपीआय पक्षाला जर आगामी निवडणूकीसाठी दहा जागा मिळाल्या नाहीत तर पार्टी उत्तर प्रदेशातील २०० जागांवर आपले उमेदवार उतरवेल असेही आठवले यांनी म्हटले आहे.
रामदास आठवले काय म्हणाले ?
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) चे अध्यक्ष आणि केंद्रिय सामाजिक राज्य मंत्री रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेशात संघटनेचा विस्तार झाला आहे. आपली संघटना गाव, ब्लॉक, जिल्हा आणि बूथ स्तरापर्यंत मजबूत आहे. याच आधारावर आपणे भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडे दहा जागांची मागणी केली आहे. आठवले पुढे म्हणाले की गेल्या १२ वर्षांपासून आपण एनडीएचा पाठींबा देत आलो आहोत. आघाडीत निवडणूक लढवणे ही आपली पहिली प्राथमिकता आहे.
SIR वर विरोधीपक्षाचे आरोप राजकीय – रामदास अठावले
आठवले पुढे म्हणाले की युपीत गरीबांसाठी पंतप्रधान निवास योजना, महिलांना विधवा पेन्शन आणि गॅस सिलिंडर सारख्या योजनांचा लाभ मिळाला आहे. तरीही विरोधी पक्ष सरकारवर आरोप लावत आहे. राहुल गांधींनी सरकारला सहकार्य करायला हवे. त्यांचे आंदोलन राजकीय आहे. निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाला सांगितले की SIR चा निर्णय तिन्ही सदस्यांच्या परवानगीने घेण्यात आला आहे.
यादीतून मृत लोकांची नावे हटली
मतदार यादीवर प्रश्न करणाऱ्या विरोधी दलांवर हल्लाबोल करताना आठवले म्हणाले की मृत नसलेले आणि संबंधित भागाचे रहिवासी नसलेल्या लोकांची नावे मतदार यादीतून हटवले आहेत. विरोधी पक्षाने यावर विचार करायला हवा. आधार आणि पॅनकार्डचा लाभ बाहेरील व्यक्तींना मिळू नये. २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत युपी आणि महाराष्ट्रात नुकसान झाले तरी आम्ही व्होट चोरीचा आरोप केला नाही.विरोधी पक्षांना समजायला हवे की आंदोलन केल्याने सरकार बदलत नाही.
