Shabana Azmi : शबाना आझमींचा हा व्हायरल व्हिडिओ का चर्चेत! श्रीदेवी, सतीश कौशिक अन् अलका याज्ञिक एकाच छताखाली अन्..
Shabana Azmi Old Video : बॉलिवूडच्या वरिष्ठ अभिनेत्री शबाना आझमी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये श्रीदेवी, सतीश कौशिक अन् अलका याज्ञिक एकाच छताखाली दिसत आहे. सध्या सर्वत्र व्हायरल व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

Shabana Azmi Old Video : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहे. कायम वादग्रस्त मुद्दे आणि धर्मावर भाष्य करणाऱ्या शाबाना आझमी आता एका व्हिडीओमुळे चर्चेत आल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेला व्हिडीओ खुद्द शबामा आझमी यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. सांगायचं झालं तर, शबाना आझमी यांनी जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते भावूक झाले आहेत. व्हिडीओमध्ये दिवंगत अभिनेता सतीश कौशिक आणि अभिनेत्री श्रीदेवी यांना पाहिल्यानंतर चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आलं.
शबाना आझमी यांचा जुना व्हिडीओ व्हायरल
नुकताच शबाना आझमी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये एका छताखाली अनेक सेलिब्रिटी एकत्र आल्याचं चित्र दिसत आहे. व्हिडीओमध्ये श्रीदेवी, सतीश कौशिक, अल्का याज्ञिक, सोनू निगम, जावेत अख्तर यांसारखे दिग्गज सेलिब्रिटी दिसत आहेत. व्हिडीओमध्ये गायक शंकर महादेवन आणि सोनू निगन गाणं गाताना दिसत आहे. तर व्हिडीओ पाहून असं देखील वाटत आहे की, जावेद अख्तर यांच्या वाढदिवसासाठी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.
View this post on Instagram
श्रीदेवी, सतीश कौशिक आणि अल्का याज्ञिक….
सांगायचं झालं तर, व्हिडीओची सुरुवातच उर्मिला मातोंडकर, सुनीता कपूर आणि अन्य लोकांपासून होते… जे पार्टीचा आनंद घेताना दिसत आहेत. तर सोनू पर्कशन इन्स्ट्रुमेंट वाजवतात आणि राजू सिंह गिटार वाजवताना दिसतात. तिथेच, शंकर महादेवन यांच्या हातात माईक दिसत आहे. तर बोनी कपूर आणि श्रीदेवी मागे बसलेले दिसत आहेत. तिथेच बाजूला सतीश कौशिक देखील बसलेले दिसत आहेत. व्हिडिओमध्ये अलका याग्निक एका खांबाच्या आधारे उभ्या असलेल्या दिसत आहेत.
जुन्या आठवणींचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत शबाना आझमी यांनी नमस्कार करणाऱ्या इमोजीसह एक भावनिक कॅप्शनही दिलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, ‘म्युझिकच्या जगातील सर्वोत्तम लोकांना आमच्या घरी पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे.’, सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.
