CJP Protest : ..तरच 3.30 वाजताच्या बैठकीला अर्थ, सरकारसोबत चर्चेआधी CJP ने स्पष्टच सांगितलं, दिल्लीत आजही 18 मेट्रो स्टेशन्स बंद

CJP Protest : दिल्लीत जंतर-मंतरवर आंदोलनाला बसलेल्या कॉकरोच जनता पार्टी आणि सरकारमध्ये आज महत्वाची बैठक होणार आहे. आज दुपारी 3.30 वाजता दुसरी बैठक होईल. या बैठकीआधी सीजेपीने एक मोठं वक्तव्य केलं आहे.

CJP Protest : ..तरच 3.30 वाजताच्या बैठकीला अर्थ, सरकारसोबत चर्चेआधी CJP ने स्पष्टच सांगितलं, दिल्लीत आजही 18 मेट्रो स्टेशन्स बंद
cjp protest
| Updated on: Jul 25, 2026 | 9:06 AM

NEET पेपर लीक प्रकरणात दिल्लीत जंतर-मंतरवर आंदोलनाला बसलेल्या कॉकरोच जनता पार्टी आणि सरकारमध्ये आज महत्वाची बैठक होणार आहे. काल CJP आणि सरकारमध्ये पहिली बैठक झाली. या बैठकीत सीजेपीने आपल्या मागण्या सरकारसमोर मांडल्या. सरकारने त्यांची बाजू सांगितली. या चर्चेनंतरही गतिरोध कायम आहे. आज दुपारी 3.30 वाजता दुसरी बैठक होईल. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवाच, त्याच्यावर तडजोड होणार नाही असं सीजेपीने आधीच स्पष्ट केलय. सरकार सुद्धा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही अशा बातम्या सुरु आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीतही तोडगा निघण्याची शक्यता कमी दिसत आहे. सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी स्पष्ट शब्दात सांगितलय की, ‘धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नसतील, त सरकारसोबत पुढच्या चर्चेला काही आधार नाही’

नीट परीक्षा रद्द झाली म्हणून आयुष्य संपवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना नुकसानभरपाई आणि प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचं आशुतोष रांका यांनी शुक्रवारी सांगितलं. या दोन्ही मुद्यांवर सरकारकडून लिखित आश्वासन मिळेल अशी अपेक्षा रांका यांनी व्यक्त केली. सरकारने आधीच ठरवलं असेल की, “धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायचा नाही, तर मग मी स्पष्ट करतो की, पुढच्या बैठकाचं काही औचित्य नाही. त्यानंतर आम्ही पुढच्या रणनितीवर काम करु. सरकार आपल्या भूमिकेवर ठाम राहिलं, तर आम्हाला नाईलाजाने कठोर निर्णय घ्यावा लागेल”

आज किती मेट्रो स्टेशन्स राहणार बंद?

दिल्लीत आजही प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. जंतर-मंतरवर सुरु असलेल्या सीजेपीच्या प्रदर्शनामुळे आणि सुरक्षा कारणांमुळे चौथ्या दिवशी दिल्ली मेट्रोचे 18 स्टेशन्स सकाळी 7.30 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. सुरक्षा यंत्रणांच्या सूचनेवरुन खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. दिल्लीत जंतर-मंतरवर सुद्धा आंदोलकांची संख्या वाढल्याची माहिती आहे. प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणांनी नवी दिल्ली आणि लुटियंस दिल्लीच्या संवेदनशील भागात सुरक्षा बंदोबस्त वाढवला आहे. प्रदर्शन स्थळाच्या आसपास अतिरिक्त पोलीस फोर्स, निमलष्करी दलाची तैनाती आणि बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us