CJP Protest: सोनम वांगचुक यांचं दिल्लीतील CJP च्या आंदोलनात सहभाग का नाही? का बाळगले मौन? त्या Video तून मोठी प्रतिक्रिया
Sonam Wangchuk on CJP Protest in Delhi Today: आज 10 ऑक्टोबर, शनिवारी दिल्लीत अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. सीजेपीने जंतरमंतरवर आंदोलनाची हाक दिली आहे. तर सीजेपीच्या पहिल्याच आंदोलनात मैदानात उतरणारे सोनम वांगचूक यांचा वेगळा सूर उमटल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

Sonam Wangchuk on CJP Protest in Delhi Today: आज दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे जंतरमंतरवर आंदोलन होणार आहे. 10 ऑक्टोबर रोजी आंदोलनाची हाक यापूर्वीच सीजेपीने दिली होती. जंतरमंतरवर यापूर्वी सीजेपीने केलेल्या आंदोलनाचा अनुभव सर्वांनाच आला आहे. त्यापार्श्वभूमीवर सरकार मोठी खबरदारी घेत आहे. रेल्वे रद्द आहेत. इंटरनेट तात्पुरते बंद करण्यात आले आहे. दिल्लीला लष्करी छावणीचे स्वरूप आले आहे. दरम्यान मे महिन्याच्या अखेरीस सुरू झालेल्या पहिल्या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे मैदानात उतरले होते. त्यांनी 26 दिवस उपोषण केले होते. पण आजच्या आंदोलनाविषयी त्यांनी वेगळाच सूर आळवला आहे. ते या आंदोलनात सहभागी होतील अशी अटकळ लावली जात होती. पण त्यांनी एका शेरमधून मोठा संदेश दिला.
‘और भी गम हैं जमाने में सियासत के सिवा’
डाव्या विचारांचा पगडा असणारे प्रसिद्ध शायर फैज अहमद फ़ैज़ यांचा शेर पेश करत सोनम वांगचुक यांनी या आंदोलनातून वेगळाच वास येत असल्याचा अप्रत्यक्ष दावा केला आहे. ‘और भी गम हैं जमाने में सियासत के सिवा’ असा हा प्रसिद्ध शेर आहे. राजकारणाव्यतिरिक्त इतरही अनेक कामं आहेत, असा त्याचा अर्थ आहे. अर्थात त्यांचा या आंदोलनाला, प्रदर्शनाला विरोध नाही. पण त्यांनी आंदोलनात सहभागी न होण्यामागील भूमिका स्पष्ट केली आहे.
वांगचुक यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. एक व्हिडिओ शेअर केला. त्याच्या अखेरीस त्यांनी, “आशा करतो की आंदोलनकर्ते हे महात्मा गांधी, बापूंना निराश करणार नाहीत” असे म्हटले आहे. त्यांनी आंदोलन शांततेत करण्याचे आवाहनही केले.
WHY I WON’T BE ABLE TO JOIN YOU ALL IN DELHI…!
Despite all efforts of the government to hinder & damage our work we continue to work for national security… making preparations as another winter comes.
This includes making artificial glaciers for water security & experiments for GLOF or glacial lake flood security… to difuse the 200+ ticking water bombs in high Himalayas.
Adapting Faiz Sahab’s words I would say…
Aur Bhi Gham Hain Zamaane Main Siyaast Ke Siva…
Rahaten aur bhi hain wasl ki raahat ke siva.Hence I send my bestest wishes to all & urge the leaders of different groups to stay united & show statesmanship, meanwhile I urge all the genZ friends to once again stay absolutely peaceful at all costs. This was the gift of Baapu that I tried to bring to Jantar Mantar in June,
I hope we won’t let Baapu down.
#JantarMantar #protest #CJP #CEC #sonamwangchuk— Sonam Wangchuk (@Wangchuk66) October 9, 2026
सोनम वांगचुक यांचे म्हणणे काय?
सोनम वांगचुक यांनी शुक्रवारी एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानुसार, सरकारने कितीही विरोध केला आणि त्यांच्या कामात अडचणी उभारल्या, नुकसान करण्याचा प्रयत्न केला तरी ते राष्ट्रीय सुरक्षेसाठी अगोदर मैदानात उतरतील. लेह, लद्दाखमधील सध्याच्या स्थितीवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. आता हिवाळा येणार आहे. पाण्याच्या सुरक्षेसाठी कृत्रिम हिमनदी तयार करायची आहे. हिम तलाव फुटून महापूराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी तयारी करायची असल्याचे सोनम वांगचुक म्हणाले. हिमालयातील उंच भागात 200 पेक्षा अधिक तलाव आहेत. त्यांचा धोका लक्षात घेता लवकर काम करायचे असल्याचे वांगचुक यांनी सांगितले.