CJP Protest Delhi : दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये गाड्या फोडल्या; हिंसक वळण

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळत आहे. आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, यामध्ये काही वाहनांच्या काचा फुटल्या त्यानंतर पोलिसांकडून देखील लाठीचार्ज करण्यात आला आहे.

CJP Protest Delhi : दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये गाड्या फोडल्या; हिंसक वळण
CJP Protest
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 20, 2026 | 8:09 PM

कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू आहे. यासाठी सोनम वांगचूक यांनी दिल्लीमधील जंतरमंतरवर त्यासाठी तब्बल 21 दिवसांपेक्षा अधिक काळ उपोषण केलं, त्यानंतर त्यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. सोनम वांगचूक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी उपोषण सुरू केलं होतं. दरम्यान आज कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने थेट संसदेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी आश्रुधुराचा मारा केला, तसेच लाठीचार्ज देखील केला.

त्यानंतर आता या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळत आहे. दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये आंदोलकांनी  जोरदार राडा केला आहे. आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेनं दगडं फेकले, या घटनेत पोलिसांच्या काही वाहनांच्या काचा फुटल्या आहेत, दरम्यान त्यानंतर गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांकडून पुन्हा एकदा आश्रुधुराचा मारा करण्यात आला. रस्त्याच्या मध्यभागी अनेक ठिकाणी फुटलेल्या वाहनांच्या काचाचे तुकडे पडल्याचं दिसून आलं.

त्यापूर्वी संसदभवन परिसरात देखील पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार राडा झाल्याचं पहायला मिळालं होतं. पोलिसांनी आंदोलकांना आडवण्यासाठी बॅरिगेड लावले होते. परंतु आंदोलकांनी ते बॅरिगेड पार केल्याने अखेर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी आश्रूधुराचा मारा केला. तसेच लाठी चार्ज देखील करण्यात आला, या घटनेत काही आंदोलक जखमी झाले आहेत. त्यानंतर आता या आंदोलनाने हिंसक वळ घेतल्याचं पहायला मिळत आहे.

सौरभ दास यांनी घेतली जे पी नड्डांची भेट 

दरम्यान हे आंदोलन सुरू असतानाच कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सैरभ दास यांनी मंत्री जे पी नड्डा यांची भेट घेतली आहे. कॉकरोच जनता पार्टीने सरकारकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत, पहिली आणि प्रमुख मागणी म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, दुसरी मागणी नीट परीक्षा प्रकरणात ज्या -ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत तसेच सोनम वांगचूक यांच्या आंदोलनात अडथळा निर्माण न करता त्यांची सुटका  अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

 

Follow Us