जंतर मंतरवर हल्ल्याचा कट? पंजाब पोलिसांची जबरदस्त कामगिरी, पाकिस्तानी दहशतवादी मॉड्यूल उद्धवस्त

ISI Terror Module: पंजाब पोलिसांनी पाकिस्तानच्या ISI समर्थित दोन दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. 4 अल्पवयीन मुलांसह 9 आरोपींना अटक केली आहे. जंतरमंतरवर रेकी करणे, पेट्रोल बॉम्ब फेकणे, रेल्वे ट्रेकवर कॅमेरे लावणे आणि पाकिस्तानसाठी हेरगिरी करणे यासाठी ही धरपकड करण्यात आली आहे.

जंतर मंतरवर हल्ल्याचा कट? पंजाब पोलिसांची जबरदस्त कामगिरी, पाकिस्तानी दहशतवादी मॉड्यूल उद्धवस्त
जंतर मंतरवर हल्ल्याचा कट? पाक दहशतादी मॉड्यूल उद्धवस्त
| Updated on: Aug 05, 2026 | 12:54 PM

Jantar Mantar Recce Terror Suspects: स्वातंत्र्य दिनापूर्वी सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. पंजाच पोलिसांनी पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयद्वारे (ISI) चालवल्या जात असलेले दहशतवादी मॉड्यूल उद्धवस्त केले. पोलिसांनी याप्रकरणी 4 अल्पवयीन मुलांसह 9 लोकांना अटक केली आहे. या तपासात खळबळजनक माहिती सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागली आहे. या मॉड्यूलचे धागेदोरे देशाची राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाशी असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

अमृतसर पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंह भुल्लर यांनी पत्रकार परिषद घेत पाकिस्तान दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला. दहशतवाद्यांवर पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. विशेष म्हणजे या मॉड्यूलमधील सर्व आरोपी हे अल्पवयीन आहे. त्यांच्या आडून पाकिस्तानने जंतर मंतरवरील आंदोलनात मोठा कट करण्याची योजना आखली होती. पाकिस्तानातून आयएसआय हा या ऑपरेशनची सूत्र हलवत होती. या अल्पवयीन मुलांना व्हिडिओ कॉल आणि पेट्रोल बॉम्ब कसा तयार करायचा, त्याचा वापर नेमका कसा करायचा, कुणाला टार्गेट करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्याचे ट्युटोरिअल तयार करण्यात आल्याचे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यातील 8 अल्पवयीन आरोपींना ट्रेनने दिल्लीत पाठवण्यात आले. तिथून ते जंतर-मंतर परिसरात दाखल झाले. जंतर मंतरवर पोहचताच या आरोपींनी रेकी केली आणि ते परतले. त्यानंतर त्यांचा या ठिकाणी पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्याची योजना होती. आंदोलन अगोदच संपले आणि कोणतीही अप्रिय घटनेपूर्वीच पोलिसांनी या मॉड्यूलचा पर्दाफाश केला.

रेल्वे ट्रॅकवर CCTV कॅमरे, सुरक्षा ठिकाणांची रेकी

पोलीस आयुक्तांच्या माहितीनुसार, पंजाबमध्ये सामाजिक सुस्थिती बिघडवण्याचे कामही या मुलांवर सोपवण्यात आले होते. राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहचवण्याची त्यांची योजना होती. या गटातील सदस्यांनी अमृतसर- जालंधर रेल्वे ट्रॅकजवळ सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे लावले होते. या ठिकाणावरून ते रेल्वे कोणत्या वेळी धावते. रेल्वेचे वेळापत्रक काय याची इंत्यभूत माहिती पाकिस्तानात पाठवण्यात येत होती. आरोपींकडून 3 पिस्तूल, 9 जिवंत काडतूस, 4 पेट्रोल बॉम्ब, एक मोटरसायकल आणि कॅमेरे जप्त करण्यात आले. पकडण्यात आलेले सर्व अल्पवयीन मुलं ही पंजाबच्या ग्रामीण भागातील आहेत. बेरोजगार आणि नशेखोरांना आयएसआयने लक्ष्य केले. त्यांच्या खात्यात विविध इतर खात्यातून पैसे पाठवण्यात आले. पाकिस्तानी हँडलर्स पंजाबमध्ये सक्रिय असल्याचे यामुळे उघड झाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us