AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! कॉकरोच इफेक्ट… आंदोलनामुळे दिल्ली मेट्रो विस्कळीत, 5 स्थानके बंद

आज राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे संसदेवर मोर्चा काढला आहे. या मोर्चामुळे दिल्लीतील संसदेच्या परिसरात आंदोलकांची मोठी गर्दी जमली आहे. अशातच आता सुरक्षेच्या कारणास्तव नवी दिल्लीतील राजीव चौकसह पाच मेट्रो स्थानके तात्पुरती बंद करण्यात आली आहेत.

मोठी बातमी! कॉकरोच इफेक्ट... आंदोलनामुळे दिल्ली मेट्रो विस्कळीत, 5 स्थानके बंद
Delhi Metro and CJP ProtestImage Credit source: Google
| Updated on: Jul 20, 2026 | 4:21 PM
Share

आज राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे संसदेवर मोर्चा काढला आहे. या मोर्चामुळे दिल्लीतील संसदेच्या परिसरात आंदोलकांची मोठी गर्दी जमली आहे. अशातच आता सुरक्षेच्या कारणास्तव नवी दिल्लीतील राजीव चौकसह पाच मेट्रो स्थानके तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. दिल्ली पोलीस आणि मेट्रोचे अधिकारी सध्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन आहेत.

राजीव चौकसह पाच मेट्रो स्थानके बंद

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन ने दिलेल्या माहितीनुसार, पटेल चौक, राजीव चौक, उद्योग भवन, सेवा तीर्थ आणि सेंट्रल सेक्रेटेरिएट या मेट्रो स्थानकांवरील एन्ट्री आणि एक्झिट तात्पुरती बंद करण्यात आली होते. मात्र, नंतर राजीव चौक आणि सेंट्रल सेक्रेटेरिएट मेट्रो स्थानकांवरील इंटरचेंज सुविधा तसेच सर्व एन्ट्री आणि एक्झिट पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

संसद भवनापासून सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने आपले आंदोलन अधिक तीव्र केले आहे. NEET पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आंदोलकांकडून मागणी करण्यात येत आहे. आज सीजेपीचा ‘संसद चलो’ मोर्चा असल्याने जंतर-मंतर आणि संसद परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.

या मेट्रो स्थानकांवर पोलिसांची विशेष नजर

नवी दिल्लीतील राजीव चौक, बाराखंबा रोड, पटेल चौक, सेवा तीर्थ आणि लोक कल्याण मार्ग या मेट्रो स्थानकांवर दिल्ली पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले आहे. या स्थानकांमधून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची नोंद ठेवली जाणार असून, आवश्यकता भासल्यास ही स्थानके तात्पुरती बंद करण्याचाही निर्णय घेतला जाऊ शकतो.

या भागात वाहतूक कोंडीची शक्यता

सीजेपीच्या संसद मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील रफी मार्ग, मोतीलाल नेहरू मार्ग, मौलाना आझाद रोड, के. कामराज मार्ग, रायसीना रोड, राजेंद्र प्रसाद रोड, पार्लमेंट स्ट्रीट, अशोक रोड, तालकटोरा रोड, पंडित पंत मार्ग आणि रकाबगंज गुरुद्वारा रोड मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन केले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...