काँग्रेसने आणले होते EVM, प्रश्न उपस्थित करणे अयोग्य; काँग्रेस नेत्याचं वक्तव्य

ईव्हीएमवर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांना उत्तर देताना एका काँग्रेस नेत्याने म्हटले की, आमच्याच पक्षानेच ईव्हीएम आणले होते. ईव्हीएम सुरू झाले तेव्हा सोनिया गांधी यूपीएच्या अध्यक्षा होत्या. त्यामुळे यावर प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही.

काँग्रेसने आणले होते EVM, प्रश्न उपस्थित करणे अयोग्य; काँग्रेस नेत्याचं वक्तव्य
| Updated on: Jun 17, 2024 | 4:05 PM

२०२४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने ईव्हीएममध्ये गडबडी केल्याचा आरोप भाजपवर केला होता. अजूनही ईव्हीएम हँक केले जाऊ शकते असा दावा अनेक जण करततात. आता यावर दिग्विजय सिंह यांचे भाऊ आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सिंह यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. ईव्हीएमवरील वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, काँग्रेस पक्षानेच ईव्हीएम आणले होते आणि त्यावर प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही. यासोबतच त्यांनी इतर अनेक मुद्द्यांवर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

NCERT च्या पुस्तकांमधून बाबरी मशिदीचा विषय काढून टाकण्याचा मुद्दा देखील देशात जोर धरू लागला आहे. यावर वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पुढे येत आहेत. लक्ष्मण सिंह यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, मुघलांनी आमचे मंदिर पाडले, हे मुलांना सांगायचे आहे का? तिथे राम मंदिर होते हा इतिहास मुलांनी वाचावा. बाबरी मशिदीचा विषय NCERT च्या पुस्तकातून काढून टाकला तर त्यात गैर काहीच नाही. जे खरे आहे तेच मुलांना सांगितले पाहिजे.

काँग्रेसच्या नेतृत्व बदलाच्या मागणीवर काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. येथे भाजपने क्लीन स्वीप केले आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेस नेतृत्व बदलावे का यावर बोलताना दे म्हणाले की, नेतृत्व बदलता कामा नये. ब्लॉक स्तरापर्यंत समित्या स्थापन कराव्यात. समित्या जो काही निर्णय घेतील त्याआधारेच 10-12 जणांना बंद खोलीत बसवून निर्णय घेऊ नये.

‘ईव्हीएम ही केवळ काँग्रेस सरकारची देणगी’

ईव्हीएमवर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांना उत्तर देताना लक्ष्मण सिंह म्हणाले की, आमच्या पक्षानेच ईव्हीएम आणले होते. ईव्हीएम सुरू झाले तेव्हा सोनिया गांधी यूपीएच्या अध्यक्षा होत्या. त्यामुळे त्यावर प्रश्न उपस्थित करू नयेत. ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही, हे काँग्रेस सरकारचे योगदान आहे. केंद्रीय दलाच्या उपस्थितीत ईव्हीएममध्ये छेडछाड होऊ शकत नाही.” इलॉन मस्क यांना सल्ला देताना ते म्हणाले की त्यांनी आपल्या देशाची चिंता करावी, इथली नाही.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे यांच्या सोशल मीडिया एक्स (पूर्वीचे ट्विटर) पोस्टवर ते म्हणाले की, सरकार पाडण्याचा विचार करू नका. तुम्ही मोठे आणि जुने नेते आहात. खरगे यांना सल्ला देताना लक्ष्मण सिंह म्हणाले की, त्यांनी पाच वर्षे कठोर परिश्रम करावे म्हणजे पाच वर्षांनी आमचे सरकार बनवता येईल.