“आमची चिंता सोडा… टोपली उचला आणि…”, काँग्रेसचा मोठा नेता पंतप्रधान मोदींना म्हणाला काय?

Congress on Regime Change PM Narendra Modi: काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार पलटवार केला. त्यानंतर आता काँग्रेसच्या गोटातूनही तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. काय आहे मोठी अपडेट?

आमची चिंता सोडा... टोपली उचला आणि..., काँग्रेसचा मोठा नेता पंतप्रधान मोदींना म्हणाला काय?
काँग्रेसचा मोठा नेता पंतप्रधान मोदींना म्हणाला काय?
| Updated on: Oct 23, 2026 | 12:10 PM

Congress on Regime Change PM Narendra Modi: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाने एक अनपेक्षित टप्पा गाठत थेट सत्ता बदलाची हाक दिली. विरोधातील अनेक नेत्यांनी सत्ता उलथवण्याचा सूर आळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी या वक्तव्याचा समाचार घेतला. एका कार्यक्रमात त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेस त्यांचे प्रोडक्ट लाँच (राहुल गांधी) करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहे. कुटुंबावरील डाग पुसण्यासाठी आता भारताच्या प्रगतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. हे कुटुंब आता काँग्रेसवर ओझे ठरत आहे, असे मोदी म्हणाले. त्यावर आता काँग्रेसने पलटवार केला आहे.

पवन खेरा यांचा मोदींवर निशाणा

Loading...

पीएम मोदींवर काँग्रेस नेते पवन खेरा यांनी निशाणा साधला आहे. तुम्ही आम्हाला काय ओझं आहे काय नाही हे शिकवू नका. भाऊ, तुम्ही आमची चिंता सोडा, तुमच्या अपयशाची टोपली उचला आणि निघून जा. देशावर तुम्ही ओझं होऊ नका. तुमचे लक्ष तरी कुठे आहे? ते तर नाराज काका आहेत, असा टोला पवन खेरा यांनी पंतप्रधानांना लगावला आहे.

सत्ता परिवर्तनाचा अर्थही सांगितला

रिजीम चेंज हा सध्या परवलीचा शब्द ठरला आहे. विरोधातील अनेक नेत्यांच्या तोंडी हा शब्द आहे. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी सत्ता उलथण्यासाठीच आम्ही उभे आहोत असे वक्तव्य केले. आता पवन खेडा यांनी रिजीम चेंजचा अर्थ सांगितला आहे. ते म्हणाले की आम्ही वोट चोर गद्दी छोड अशी मोहिम राबवणार आहोत. संपूर्ण देशच हे सांगतोय. असं म्हणतोय. आम्ही सुद्धा आमचा संकल्प दृढपणे सांगत आहोत. आपल्या सर्वांना हे सरकार हरवायचं आहे आणि व्यवस्था बदलायची आहे, असे खेरा म्हणाले.

भाजपला करून दिली आठवण

यावेळी 1977 मधील राजकीय घटनाक्रमाचा उल्लेख पवन खेरा यांनी केला. प्रत्येक वेळी विरोधक जेव्हा रस्त्यावर येतो. एखादे मोठे आंदोलन होते. तर त्याचा उद्देश निवडणुकीद्वारे सत्ता परिवर्तन हेच असते. विरोधकांचा तोच उद्देश असतो. काँग्रेस पक्ष हा आज नाही तर गेल्या 100 वर्षांपासून संघाच्या विचारधारेविरोधात काम करत आहे. ही काही पहिली वेळ नाही, असे खेरा म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us