Congress : सरकारी नोकरीसाठी मुलींना शय्यासोबत करावी लागते, काँग्रेस आमदाराचे धक्कादायक विधान; कर्नाटकातील राजकारण तापले

कर्नाटक कँग्रेसचे (Congress) प्रवक्ते आणि आमदार प्रियांक खडगे (Priyank Kharge) यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कर्नाटकचे राजकारण चांगलेच तापले आहे. सरकारी नोकरी (job) प्राप्त करण्यासाठी मुलींना शय्यासोबत करावी लागते तर मुलांना लाच द्यावी लागते असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

Congress : सरकारी नोकरीसाठी मुलींना शय्यासोबत करावी लागते, काँग्रेस आमदाराचे धक्कादायक विधान; कर्नाटकातील राजकारण तापले
Image Credit source: Aajtak
अजय देशपांडे

|

Aug 13, 2022 | 1:07 PM

नवी दिल्ली : कर्नाटक कँग्रेसचे (Congress) प्रवक्ते आणि आमदार प्रियांक खडगे (Priyank Kharge) यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कर्नाटकचे राजकारण चांगलेच तापले आहे. सरकारी नोकरी (job) प्राप्त करण्यासाठी मुलींना शय्यासोबत करावी लागते तर मुलांना लाच द्यावी लागते असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांनी नोकर भरती घोटाळ्यावरून कर्नाटक सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच नोकर भरती घोटळ्याची चौकशी एसआयटी मार्फत केली जावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. नोकर भरतीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे खडगे यांनी म्हटले आहे. राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी म्हटलं आहे की, राज्य सरकारने सरकारी नोकऱ्या विकण्याचा निर्णय घेतला आहे. एका मंत्र्याने नोकरीसाठी तरुणीला आपल्यासोबत शय्यासोबत करण्यास सांगितले होते. घोटाळा उघड झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला हे मी पुराव्यासह सिद्ध करू शकतो असे त्यांनी म्हटले आहे. आमदार प्रियांक खडगे यांच्या या वक्तव्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

नोकर भरतीमध्ये घोटाळा

मीडिया रिपोर्टनुसार प्रियांक खडगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये असा दावा केला आहे की, कर्नाटक पॉवर ट्रांन्समिशन कॉरपोरेशन लिमिटेडमध्ये एकूण 1492 पदासाठी भरती निघाली होती. या भरती परीक्षेत विद्यार्थ्यांनी ब्लूटूथचा वापर केला, त्यातील एका विद्यार्थ्याला अटक देखील करण्यात आली. हा सौदा एकूण 600 पदांसाठी करण्यात आला असावा, सहाय्यक अभियंता या पदासाठी 50 लाख तर कनिष्ठ अभियंता या पदासाठी 30 लाख रुपये घेण्यात आले. हा सर्व घोटाळा 300 कोटी रुपयांचा असावा असा अंदाज असल्याचे खडगे यांनी म्हटले आहे.सरकार जवळपास तीन लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

हे सुद्धा वाचा

भाजपाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानावर टीका

दरम्यान यावेळी काँग्रेस आमदार खडगे यांनी केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’अभियानावर देखील जोरदार निशाणा साधला आहे.भाजपा देशभक्तीचा वापर हा व्यवसायासाठी करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. पॉलिस्टर झेंड्याचा वापराला परवानगी देण्यासाठी ध्वज संहितेमध्ये बदल करण्यात आला आहे. याचा सर्वाधिक फायदा हा रिलायन्स कंपनीला होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या पगारामध्ये कपात करून त्यांना सक्तीने झेंडे दिले जात असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें