कोंबडीच्या नावाने या गावात झाला मोठा वाद, काय आहे नेमके प्रकरण

कोंबडीच्या नावावरुन एका गावात हंगामा होऊन गावकऱ्यांनी कलेक्टरला निवेदन दिले आहे. या कोंबडीच्या नावाने आपल्या श्रद्धास्थानांना धक्का बसल्याने ते नाव बदल्यात यावे अशी मागणी होत आहे.

कोंबडीच्या नावाने या गावात झाला मोठा वाद, काय आहे नेमके प्रकरण
| Updated on: Jul 18, 2025 | 5:13 PM

कोंबडीचे नाव ‘नर्मदा’ ठेवल्याने समाजातील एक वर्ग दुखावल्याची विचित्र प्रकार घडला आहे. या कोंबडीच्या प्रजातीचे हे नाव असल्याने आता काय करायचे हा प्रश्न पडला आहे. मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील अबगांव खुर्द येथील एका कॉलेज संचालकाने कोंबड्याच्या एका प्रजातीच्या ‘नर्मदा’ नावाचा उल्लेख समाजमाध्यमामध्ये केल्याने नार्मदीय ब्राह्मण समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. या गावातील लोकांचे म्हणणे आहे की नर्मदा ही केवळ नदी नाही तर आमची पूज्य देवी असल्याने नदीचे नाव कोंबडीला देणे योग्य नसल्याचे म्हटले असून हा आमच्या आस्थेचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

या संदर्भात समाजातील लोकांना एक संयुक्त निवेदन कलेक्टरना दिले आहे आणि संबंधित कॉलेज संचालकाच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. नार्मदीय समाजाचे ट्रस्टी अशोक पाराशर यांनी म्हटले आहे की माँ नर्मदा आमची आराध्य आहे. अशा नावाचा वापर कोंबडीसाठी करणे एकदमच चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

पोस्टरवर काय लिहीले होते?

समाजमाध्यमातील ज्या पोस्टवरुन हा वाद निर्माण झाला होता. त्यात कॉलेजचे संचालक डॉ. राजीव खरे यांनी सोशल मीडियावर लिहीले होते की त्यांच्याजवळ ‘नर्मदा’प्रजातीच्या कोंबड्या असून त्या त्यांना विकायच्या आहेत. पोस्टमध्ये लिहीले होते की ‘लाल बहादूर शास्री पत्रोपाधी महाविद्यालय पोल्ट्री फार्म प्रशिक्षण फार्ममध्ये जिल्हावासियांच्या स्वयंरोजगाराच्या हेतूने देशी कोंबड्या ( कडकनाथ,नर्मदा आणि सोनाली ) विक्रीसाठी उपलब्ध आहेत.’

कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता

या संदर्भात कॉलेजचे संचालक डॉ. राजीव खरे यांनी सांगितले की आपण या कोंबड्या नानाजी देशमुख पशु चिकीत्सा युनिव्हर्सिटी, जबलपुर येथून विकत आणल्या आहेत. त्याच ठिकाणी त्यांना नर्मदा हे नाव मिळालेले आहे. आम्ही कोणाच्या भावना दुखावण्याच्या हेतूने हे केलेले नाही. आता आपण पोस्टरवरुन नाव हटवले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.