
आजकाल सायबर क्राईमच्या गुन्ह्यांत मोठी वाढ झाली आहे. रोज वेगवेगळ्या माध्यमातून लोकांची आर्थिक तसेच अन्य स्वरुपाची फसवणूक केली जाते. तशा शेकडो तक्रारी रोज देशभरातील पोलीस ठाण्यात नोंदवल्या जातात. हीच बाब लक्षात घेऊन लोकांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून गोव्यात महत्त्वाच्या आशा सायबर सुरक्षेची आवश्यकता सांगण्यासाठी एका कार्यशाळेचे आयोजन करतण्यात आले. कॉग्निफ्लक्स ट्रेनिंग्स अँड कन्लटिंग प्रा. लि. तर्फे ही कार्यशाळांची मालिका आयोजित करण्यात आली होती. 11 ते 13 जून अशा एकूण तीन दिवस गोव्यात कार्यशाळा मालिका मोठ्या उत्साहात पार पडली.
या कार्यशाळा मालिकेत प्रसिद्ध असे सायबर क्राईम एक्स्पर्ट आणि सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेटर डॉय रक्षित टंडन ( Dr. Rakshit Tandon) यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळा मालिकेत एकूण 1000 पेक्षा अधिक विद्यार्थी तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील 500 पेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते. या कार्यशाळेत भाग विद्यार्थ्यांपासून ते कॉर्पोरेट क्षेत्रात उच्च पदांवर काम करणाऱ्या अधिकारी सहभागी झाले होते.
या मालिकेत एकूण चार वेगवेगळ्या कार्यशाळा आयोजित करण्यात आले होत्या. विद्यार्थ्यांसाठी, कॉर्पोरेट क्षेत्रातील अधिकाऱ्यांसाठी, आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठीही येथे वर्कशॉप आयोजित करण्यात आला.
विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला वर्कशॉप मिरामार येथील शारदा मंदीर हायसुक्ल, गुजिरा येथील एस एस डेम्पो कॉलेज तसेच वेगवेगळ्या शाळांसाठी एकत्रितपणे मुस्टिफंड हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आला. या सर्व वर्कशॉपमध्ये एकूम 1000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यावेळी विद्यार्त्यांना डिजिटल हायजीन, सायबर शिष्टाचार, डिजिटल डायट, ऑनलाईन जगात सुरक्षित कसे राहायचे? याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
द फर्न्स कदंबा येथे कॉर्पोरेट वर्कशॉप आयोजित करण्यात आला. या वर्कशॉपला औषधनिर्माण, कोर्पोरेट हाऊसेस, गोव्यातील उद्योजक यांचे प्रतिनिधी सहभागी जाले. या वर्कशॉपमध्ये बिझनेस डेटा कसा सुरक्षित ठेवायचा, आर्थिक फसवणुकीपासून कसे सावध राहायचे, सायबर सुरक्षा मजबूत कशी करायची याबाबत सविस्तरपणे माहिती देण्यात आली.
डोना पॉलामधील ताज सिडेड दे गोवा येथे वेगवेगळ्या कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक, सीईओ, संचालकांसाठी उच्चस्तरीय वर्कशॉपही आयोजित करण्यात आला होता. संस्थेचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी धोरणात्मक दुष्टीकोन कसा असला पाहिजे, डिजिटल ओळख सुरक्षित कशी ठेवली पाहिजे, सायबर धोके कमी करण्यासाठी काय केले पाहिजे? याबाबत माहिती देण्यात आली.
गोव्यातील फर्न्स कदंबा येथे आयटी क्षेत्रात काम करण्यासाठीही एक वर्कशॉप आयोजित करण्यात आला होता. यात सायबर घुसखोरी, ऑनलाईन धमक्या, यंत्रणा सुरक्षित ठेवण्यासाठी डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी याविषयी माहिती देण्यात आली.
दरम्यान, कॉग्निफ्लक्स ट्रेनिंग्ज अँड कन्सल्टिंग प्रा. लि.चे संस्थापक मनोज पाटील यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले तसेच या कार्यशाळेसाठी सर्व सुविधा पुरवली.