फनी चक्रीवादळ उद्या ओडिशा किनारपट्टीवर धडकणार, हाय अलर्ट जारी

भुबनेश्वर (ओडिशा) : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘फनी’ चक्रीवादळ सध्या झपाट्याने ओडिशाच्या दिशेने पुढे सरकत आहे. येत्या शुक्रवारी म्हणजे 3 मे रोजी हे चक्रीवादळ जगन्नाथ पुरीच्या किनाऱ्यावर धडकेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. फनी चक्रीवादळ सध्या ताशी सहा किलोमीटर वेगाने ओडिशाकडे सरकत आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ओडिशा किनारपट्टीतील आठ लाखाहून अधिक नागरिकांचे स्थलांतर …

, फनी चक्रीवादळ उद्या ओडिशा किनारपट्टीवर धडकणार, हाय अलर्ट जारी

भुबनेश्वर (ओडिशा) : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘फनी’ चक्रीवादळ सध्या झपाट्याने ओडिशाच्या दिशेने पुढे सरकत आहे. येत्या शुक्रवारी म्हणजे 3 मे रोजी हे चक्रीवादळ जगन्नाथ पुरीच्या किनाऱ्यावर धडकेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. फनी चक्रीवादळ सध्या ताशी सहा किलोमीटर वेगाने ओडिशाकडे सरकत आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ओडिशा किनारपट्टीतील आठ लाखाहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीलगत तयार झालेल्या जास्त दाबामुळे फनी चक्रीवादळ निर्माण झालं आहे. हे वादळ उद्या ओडिशा किनारपट्टीवर धडकणार आहे. तसेच हे वादळ भीषण रुप धारण करण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

या पार्श्वभूमीवर ओडिशा, आंध्र प्रदेश व पश्चिम बंगाल यांसह इतर ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आलं आहे.  फनी चक्रीवादळामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी नौदल, हवाई दल, तटरक्षक दल यांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागातर्फे यलो वार्निंगही देण्यात आलं आहे.

ओडिशातील हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फनी चक्रीवादळ हे ओडिशा किनारपट्टीपासून अवघ्या 540 किलोमीटर दूर आहे. या वादळामुळे मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या वादळापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी 880 छावण्या उभारण्यात आल्या आहेत. तसेच राज्यातील शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे राज्य सरकारने आदेश दिले आहेत. तसेच फनी चक्रीवादळाची तीव्रता बघता, ओडिशा, आंध्र प्रदेश व पश्चिम बंगाल या ठिकाणच्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही रेल्वेगाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *