रेल्वे पार्सल व्यवस्थापन प्रमाणीमध्ये अमुलाग्र बदल, संगणकीकरणाचा विस्तार होणार

| Updated on: Mar 14, 2021 | 11:26 PM

सामान्य माणूस देखील या सेवांचा वापर घरगुती सामान, फर्निचर, दुचाकी इत्यादींच्या वाहतुकीसाठी करतात. त्यांच्यासाठी रेल्वेची पार्सल सेवा ही सोयीस्कर वाहतुकीची सुविधा आहे.

रेल्वे पार्सल व्यवस्थापन प्रमाणीमध्ये अमुलाग्र बदल, संगणकीकरणाचा विस्तार होणार
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची पार्सल सेवा विविध स्थानकांवरून छोट्या कन्साईनमेंटसाठी वाहतूक सुविधा पुरवते. छोटे व्यवसाय आणि व्यापारी (विशेषत: लहान शहरे आणि गावांमधील) मोठी शहरे आणि उत्पादन केंद्रांमधून आपला माल व्यवसायाच्या ठिकाणी वेगवान, विश्वासार्ह आणि स्वस्त मार्गाने पोहचवण्यासाठी या सेवांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. सामान्य माणूस देखील या सेवांचा वापर घरगुती सामान, फर्निचर, दुचाकी इत्यादींच्या वाहतुकीसाठी करतात. त्यांच्यासाठी रेल्वेची पार्सल सेवा ही सोयीस्कर वाहतुकीची सुविधा आहे.(changes in the parcel management system of Indian Railways)

पार्सल व्यवस्थापन प्रणालीचे आधुनिकीकरण

पार्सलचे शुल्क केवळ वजन आणि आकाराच्या आधारे आकारले जाते, वस्तूंच्या प्रकारानुसार नाही. पार्सल व्यवस्थापन प्रणालीचे संगणकीकरण 84 ठिकाणांवरून दुसऱ्या टप्प्यात आणखी 143 ठिकाणापर्यंत आणि तिसऱ्या टप्प्यात 523 ठिकाणांपर्यंत विस्तारण्यात येत आहे.

पार्सल प्रणालीत वाढीव वैशिष्ट्ये

> > पार्सल व्यवस्थापन प्रणालीच्या सार्वजनिक संकेतस्थळासाठी सुधारित युझर फ्रेंडली इंटरफेस www.parcel.indianrail.gov.in
>> पीएमएसमध्ये पार्सलसाठी 120 दिवसांचे आगाऊ आरक्षण करण्याची तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे.
>> पीएमएस संकेतस्थळावर ऑनलाइन ई-फॉरवर्डिंग नोट मॉड्यूलवर पार्सल जागेसाठी उपलब्धता दाखवली जाते .
>> संगणकीकृत काउंटरमार्फत स्थानकांवरील पार्सल कार्यालयात पार्सल / सामानाचे आरक्षण करणे आणि इलेक्ट्रॉनिक वजन प्रणालीद्वारे स्वयंचलितपणे वजन करणे .
>> पार्सलच्या ट्रॅकिंगसाठी प्रत्येक मालावर बारकोडिंग, जीपीआरएस नेटवर्कद्वारे बारकोड स्कॅनिंगद्वारे पॅकेजेस स्थिती अद्ययावत करणे.
>> आरक्षणाच्या वेळी देण्यात आलेल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पार्सल बुकिंग, लोडिंग, अनलोडिंगपासून प्रत्येक टप्प्यावर ग्राहकांना (प्रेषक आणि प्राप्तकर्ता) एसएमएस पाठवणे.
>> ग्राहकांसाठी अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर पार्सल संकेतस्थळ www.parcel.indianrail.gov.inवर पॅकेजेस ट्रॅक करणे .
>> आरक्षणाच्या वेळी जीएसटीएन पोर्टलद्वारे प्रेषकाची (sender) ऑनलाईन जीएसटीएन पडताळणी.

आता धावत्या रेल्वेत प्रवासी बोर होणार नाहीत!

रेल्वे प्रवाशांना आता मनोरंजनासाठी एख खास नवी सुविधा मिळणार आहे. रेल्वे पीएसयू रेलटेल (RailTel) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रेल्वेमध्ये बहुप्रतिक्षित अशा कंन्टेंट ऑन डिमांड (CoD) सेवा या महिनापासूनच सुरु केली जाणार आहे. या सुविधेनुसार प्रवाशांना रेल्वेत प्रिलोडेड मिल्टीलिंग्वल कंटेट उपल्बध करुन दिला जाईल. त्यात चित्रपट, बातम्या, म्युधिक व्हिडीओ आणि जनरल एन्टरटेन्मेंटचा सहभाग असेल.

रेलटेलचे सीएमडी पुनीत पुनावाला यांनी सांगितलं की, बफर फ्री सेवा निश्चित करण्यासाठी मीडिया सर्व्हर रेल्वेच्या डब्यात ठेवलं जाईल. प्रवासी धावत्या रेल्वेतही आपल्या डिव्हाईसमध्ये हाय क्वालिटी असणारे बफर फ्री स्ट्रिमिंगचा आनंद घेऊ शकणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे वेळोवेळी यातील कंटेन्ट अपडेट होत राहील.

संबंधित बातम्या :

भारतीय रेल्वेची खास ‘लाईफलाईन एक्सप्रेस’, प्रत्येक भारतीयाचा अभिमान!

रेल्वेचा झिरो बेस्ड टाईमटेबल काय आहे? प्रवाशांवर काय परिणाम होणार?

changes in the parcel management system of Indian Railways