मोठा झटका… अभिजीत दीपके, सौरभ आणि रांकांवर FIR… कोर्टात तातडीची सुनावणी; काय घडलं?

दिल्ली उच्च न्यायालयात एका महिलेने अभिजीत दीपके, सौरभ आणि रांका (CJP नेते) यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली आहे. पंतप्रधान मोदींसोबत तिचे डीपफेक AI फोटो तयार करून व्हायरल केल्याचा आरोप आहे.

मोठा झटका... अभिजीत दीपके, सौरभ आणि रांकांवर FIR... कोर्टात तातडीची सुनावणी; काय घडलं?
abhijit dipke
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 25, 2026 | 1:00 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कथित डीपफेक फोटो बनवून ते व्हायरल केल्या प्रकरणाच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात आजच सुनावणी होणार आहे. ही याचिका 25 वर्षाच्या एका महिलेने दाखल केली आहे. सीजेपी संघटनेशी संबंधित कार्यकर्त्यांनी माझ्या फोटोंशी छेडछाड करून एआयने बनवलेले आक्षेपार्ह फोटो व्हायरल केले आहेत, असा आरोप या महिलेने याचिकेत केला आहे. त्यावर कोर्टाने या प्रकरणी आज दुपारी सुनावणी होऊ शकते, असं म्हटलं आहे.

या महिलेने याचिकेत सीजेपीचे चार नेते सौरव दास, अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि रत्ना सिंह यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. या चौघांनी माझ्या खासगी फोटोशी एआयद्वारे छेडछाड केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत माझे फोटो अश्लील पद्धतीने दाखवले आहेत. हे डीपफेक फोटो तयार करून सार्वजनिक रित्या ते व्हायरल केले आहेत. जुलैमध्ये झालेल्या सीजेपीच्या दिल्लीतील आंदोलनावेळी या फोटोंचा वापर करण्यात आल्याचा आरोप या महिलेने याचिकेत केला आहे.

हुबेहूब फोटो

एआयच्या माध्यमातून हुबेहूब दिसणारे फोटो तयार केले जातात. त्यालाच डीपफेक फोटो म्हणतात. खरे फोटो मॉर्फ केले जातात. ते बदलले जातात. आणि विचित्र पद्धतीने व्हायरल करून एखाद्याची बदनामी केली जाते. अशा फोटोंद्वारे एखाद्याला ब्लॅकमेलही केलं जातं. तसेच एखाद्याची दिशाभूलही केली जाऊ शकते.

महिलेने काय म्हटलं?

महिलेच्या म्हणण्यानुसार, या संपूर्ण घटनेने आपल्याला मानसिक त्रास झाला. तसेच असंख्य त्रास सहन करावा लागला. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने याची दखल घेऊन एफआयआर दाखल करून घेतला आहे. 24 सप्टेंबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. एफआयआर दाखल केल्यानंतरही पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही. तसेच मेटा प्लॅटफॉर्म्सला इंटरनेटवरून हे फोटो हटवण्यासाठी कोणतीही नोटीस पाठवण्यात आलेली नसल्याचं या महिलेने याचिकेत म्हटलं आहे.

एफआयआर दाखल केल्यानंतरही कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. तसेच इंटरनेटवरून फोटो हटवले गेले नाहीत. त्यामुळे या महिलेने थेट दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेऊन या प्रकरणी सुनावणी करण्याची मागणी केली आहे. तसेच इंटरनेटवरून हे फोटो तात्काळ प्रभावाने हटवण्याची मागणीही या महिलेने केली आहे. त्याची कोर्टाने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणावर आजच सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us