AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिला बूट मीच फेकून मारेन… संजय राऊत कुणावर भडकले?

संजय राऊत यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर तीव्र टीका केली आहे. "लोकशाहीची हत्या" केल्याचा आरोप करत राऊत म्हणाले, "देशातील गद्दारांना पहिला बूट मीच फेकून मारेन."

पहिला बूट मीच फेकून मारेन... संजय राऊत कुणावर भडकले?
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 25, 2026 | 11:45 AM
Share

आताचा भारत हा जंतरमंतर नंतरचा आहे. मोदींनी गुंगीचं औषध दिलेला हा भारत नाही. हा जागृत भारत आहे. या भारतात तरुण रस्त्यावर उतरतात. झुरळांची फौज रस्त्यावर उतरली. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आताही या कॉकरोचने निवडणूक आयुक्तांविरोधात आवाज उठवला आहे. अभिजीत दीपकेने अल्टिमेटम दिलाय तो योग्यच आहे. त्यामुळे आता काही लोक देश सोडून पळून जातील, असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर हल्ला चढवला असून दीपके यांचं समर्थन केलं आहे. तसेच देशातील गद्दारांना पहिला बूट मीच फेकून मारेन, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

ज्ञानेश कुमार हे गुन्हेगार आहेतच. पण देशाचे खरे गुन्हेगार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आहेत. सर्वच क्षेत्रात त्यांनी हुकूमशाही पद्धतीने निर्णय घेतला आहे. त्यांनी लोकशाहीची हत्या केली आहे. इंदिरा गांधी या लोकशाहीच्या सर्वात मोठ्या संरक्षक होत्या. त्यांनाही निवडणूक घोटाळे करून जिंकता आलं असतं. पण त्या पराभूत झाल्या. त्यांनी लोकशाहीचा आदर राखला, असं संजय राऊत म्हणाले.

यांचा बाप खाली उतरला तरी…

सध्याच्या माफिया गँगने सर्व यंत्रणांवर ताबा मिळवला आहे. राष्ट्रपती, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टसह सर्वांना गुलाम केलं आहे, असं सांगतानाच 2029मध्ये फेरबदल होतील. यांचा बाप जरी खाली उतरला तरी फेरबदल होणारच आहे. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांनी आता माफीचा साक्षीदार होणच योग्य आहे. ज्ञानेश कुमार यांच्यावर महाभियोग चालवण्यासाठी आधी नोटीस दिली होती. पण राज्यसभेच्या सभापतींनी ती फेटाळून लावली होती. आता त्यांना ती फेटाळता येणार नाही, असं राऊत यांनी सांगितलं.

पळून पळून मारतील

राहुल गांधी दयावान आहेत. राष्ट्राच्या हितासाठी काम करत आहेत. निवडणूक आयोगाची गद्दारी समोर आणत आहे. येत्या 2029मध्ये देशात न्याय सरकार येणार आहे. देशातील गद्दारांना जोडे मारले जातील. पळून पळून त्यांना जोडे मारले जाणार आहेत. या गद्दारांना पहिला बूट मीच फेकून मारेन, असं राऊत म्हणाले.

भाजपने इव्हेंट करू नये

यावेळी त्यांनी दुष्काळावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. कर्जमाफीची घोषणा झाल्यावर बोलू. आधीची कर्जमाफी कुणाला मिळाली? राजकारणापलिकडे जाऊन पाहावं लागेल. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे. दुष्काळ निवारणाचा भाजपने इव्हेंट करू नये, असा टोला त्यांनी लगावला.

Follow Us
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण
शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा...
Chintamani Ganpati : शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा भावूक निरोप
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
Video : गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
Video: पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ
Mumbai Ganpati Visarjan 2026 | लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ; गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी