MJ Akbar Defamation Case मधून प्रिया रमाणींची मुक्तता, एम.जे.अकबर यांचा मानहानीचा दावा फेटाळला

माजी केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यातून पत्रकार प्रिया रमाणी यांची मुक्तता करण्यात आली आहे. MJ Akbar defamation case

MJ Akbar Defamation Case मधून प्रिया रमाणींची मुक्तता, एम.जे.अकबर यांचा मानहानीचा दावा फेटाळला
प्रिया रमाणी एम जे अकबर
| Updated on: Feb 17, 2021 | 4:03 PM

नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यातून पत्रकार प्रिया रमाणी यांची मुक्तता करण्यात आली आहे. एम. जे. अकबर यांनी प्रिया रमाणी यांच्या विरोधात केलेल्या मानहानीच्या दाव्यावर दिल्ली न्यायालयानं निकाल जाहीर केला आहे. #MeToo मोहिमेदरम्यान पत्रकार प्रिया रमाणी यांनी माजी मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे अकबर यांना राजीनामा द्यावा लागला होता. अतिरिक्त मुख्य महानगरीय दंडाधिकारी रवींद्र कुमार पांडे यांनी हा निकाल दिला. तब्बल दोन वर्ष अकबर यांच्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर दिल्ली न्यायालयानं निकाल दिला आहे. (Delhi Court acquitted journalist Priya Ramani in the MJ Akbar defamation case)

दिल्ली न्यायालयाचा निर्णय काय?

दिल्ली न्यायालयानं एम.जे. अकबर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यातून पत्रकार प्रिया रमाणी मुक्तता केली आहे. न्यायालयानं यावेळी ‘राईट ऑफ डिग्निटी गमावून राईट ऑफ रेप्युटेशनचं संरक्षण करता येणार नाही, असं न्यायालयानं निकालात म्हटलं आहे. दिल्ली न्यायालयानं दिलेल्या निर्ण्याचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केले आहे. भारतातील महिलांसाठी ऐतिहासिक दिवस आहे, असंही म्हटलं गेलं आहे.

2018  मध्ये सुरु झालेल्या #MeToo मोहिमेदरम्यान पत्रकार प्रिया रमाणी यांनी एम. जे. अकबर यांच्यावर आरोप केले होते. प्रिया रमानी यांनी एम.जे. अकबर यांनी लैगिंक शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर एम.जे. अकबर यांना 17 ऑक्टोबर 2018 मध्ये केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अकबर यांनी प्रिया रमाणी यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता.

एम.जे. अकबर यांची भूमिका

माजी मंत्री अकबर यांनी न्यायालयात प्रिया रमानी यांनी 20 वर्षानंतर त्यांची प्रतिष्ठा घालवण्यासाठी आरोप केले असल्याचा दावा केला होता. रमानी यांचं लैगिंक शोषण झालं होते तर त्या इतकी वर्ष गप्प का राहिल्या. आरोप केल्यानंतर त्यांनी एकही पुरावा सादर केलेला नाही. त्यांच्याशी कधी गैरवर्तन झालं? कुठं झालं? याचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे प्रिया रमाणी यांना शिक्षा द्यावी, अशी मागणी एम.जे.अकबर यांनी केलीय.

प्रिया रमाणी यांची भूमिका

प्रिया रमाणी यांनी न्यायालयात त्यांची बाजू मांडताना सांगितले की, अकबर यांची प्रतीमा चांगली नाही. इतर महिलांनी देखील त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. बंद खोलीत झालेल्या घटनांचा कोणीही साक्षीदार नसतो. अकबर यांची याचिका फेटाळून लावावी, अशी मागणी प्रिया रमाणी यांनी केली.

संबंधित बातम्या

#MeToo | एम. जे. अकबर प्रिया रमाणी मानहानी खटल्याचा निकाल लागणार दिल्ली न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

सरकारी कार्यालयातही #MeToo, वरीष्ठावर महिला कर्मचाऱ्यांचा आरोप

(Delhi Court acquitted journalist Priya Ramani in the MJ Akbar defamation case)