AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

#MeToo | एम. जे. अकबर प्रिया रमाणी मानहानी खटल्याचा निकाल लागणार दिल्ली न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

माजी केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांनी पत्रकार प्रिया रमाणी यांच्यावर दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात दिल्ली न्यायालय निकाल जाहीर करेल. Priya Ramani MJ Akbar

#MeToo | एम. जे. अकबर प्रिया रमाणी मानहानी खटल्याचा निकाल लागणार दिल्ली न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
प्रिया रमाणी एम जे अकबर
| Updated on: Feb 10, 2021 | 10:55 AM
Share

नवी दिल्ली: #MeToo मोहिमेदरम्यान पत्रकार प्रिया रमाणी यांनी माजी मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे अकबर यांना राजीनामा द्यावा लागला होता. माजी केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांनी पत्रकार प्रिया रमाणी यांच्यावर दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात दिल्ली न्यायालयाकडून निकाल जाहीर होणार आहे. अतिरिक्त मुख्य महानगरीय दंडाधिकारी रवींद्र कुमार पांडे हे  आज दुपारी निकाल देणार आहेत. सुनावणी झाल्यानंतर न्यायलयानं अकबर यांच्या याचिकेवरील निकाल 1 फेब्रुवारी रोजी राखून ठेवला होता. (Delhi Court will pronounce the judgement on MJ Akbar defamation case against Priya Ramani)

2018  मध्ये सुरु झालेल्या #MeToo मोहिमेदरम्यान पत्रकार प्रिया रमाणी यांनी एम. जे. अकबर यांच्यावर आरोप केले होते. प्रिया रमानी यांनी एम.जे. अकबर यांनी लैगिंक शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर एम.जे. अकबर यांना 17 ऑक्टोबर 2018 मध्ये केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अकबर यांनी प्रिया रमाणी यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता.

एम.जे. अकबर यांची भूमिका

माजी मंत्री अकबर यांनी न्यायालयात प्रिया रमानी यांनी 20 वर्षानंतर त्यांची प्रतिष्ठा घालवण्यासाठी आरोप केले असल्याचा दावा केला होता. रमानी यांचं लैगिंक शोषण झालं होते तर त्या इतकी वर्ष गप्प का राहिल्या. आरोप केल्यानंतर त्यांनी एकही पुरावा सादर केलेला नाही. त्यांच्याशी कधी गैरवर्तन झालं? कुठं झालं? याचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे प्रिया रमाणी यांना शिक्षा द्यावी, अशी मागणी एम.जे.अकबर यांनी केलीय.

प्रिया रमाणी यांची भूमिका

प्रिया रमाणी यांनी न्यायालयात त्यांची बाजू मांडताना सांगितले की, अकबर यांची प्रतीमा चांगली नाही. इतर महिलांनी देखील त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. बंद खोलीत झालेल्या घटनांचा कोणीही साक्षीदार नसतो. अकबर यांची याचिका फेटाळून लावावी, अशी मागणी प्रिया रमाणी यांनी केली.

#MeToo मोहिमेत अनेक महिलांनी केले आरोप

2018 मध्ये सुरु झालेल्या #MeToo मोहिमेंअतर्गत मनोरंजन आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या लैगिंक शोषणाबद्दल आवाज उठवला होता. यामध्ये मोठमोठ्या व्यक्तींवर आरोप करण्यात आले होते.

हॉलीवूडमध्ये गाजलेल्या मीटू चळवळीला देशातही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळला होता. #MeToo या चळवळीअंतर्गत अनेक महिलांनी आपलं लैंगिक शोषण आणि छेडछाड झाल्याचे आरोप केले होते. यामध्ये बॉलिवूडमधील काही दिग्गज मंडळींवरही हे आरोप झाले. अनेक वर्षांनंतर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली होती. अमेरिकेत राहत असलेली तनुश्री दत्ता भारतात आली आणि तिने थेट नाना पाटेकर यांच्यावर आरोप केले.

संबंधित बातम्या:

#Metoo against Anurag Kashyap | #Metooच्या आरोपानंतर राधिका, तापसीचा अनुराग कश्यपला पाठिंबा

सरकारी कार्यालयातही #MeToo, वरीष्ठावर महिला कर्मचाऱ्यांचा आरोप

(Delhi Court will pronounce the judgement on MJ Akbar defamation case against Priya Ramani)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.