विद्यार्थ्यांच्या मोर्चावर लाठीमार, जंतरमंतरवरचं आंदोलन पेटलं, मेट्रो स्टेशन बंद, इंटरनेट जॅम

विद्यार्थ्यांच्या मोर्चावर लाठीमार करण्यात आलाय. जंतरमंतरवरचं कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन पेटल्याचे समोर आलं आहे.

विद्यार्थ्यांच्या मोर्चावर लाठीमार, जंतरमंतरवरचं आंदोलन पेटलं, मेट्रो स्टेशन बंद, इंटरनेट जॅम
| Updated on: Jul 20, 2026 | 10:52 AM

दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीने आंदोलनाची घोषणा केली आहे. कॉकरोच जनता पार्टीचा पावसाळी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी ‘संसद मोर्चा’ संसदेवर धडकणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दिल्लीत जागोजागी पोलीस पाहायला मिळत आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो स्टेशन बंद केले आहेत. त्याचबरोबर इंटरनेट जॅम देखील केलं आहे. दिल्लीतील आजचं आंदोलन जंतरमंतरवरच पेटल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पोलिसांना विद्यार्थ्यांच्या मोर्चावर लाठीमार करावा लागल्याचे समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन जंतर-मंतरवरच पेटलंय. कॉकरोच जनता पार्टीच्या विद्यार्थ्यांवर जंतर-मंतर परिसरातचं दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. या विद्यार्थ्यांना जंतर-मंतरवरून संसदेत जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. पोलीस रोखत असतानाही आंदोलक संसदेकडे जात आहेत. त्यामुळे पोलिसांनी आंदोकर्ते विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला आहे, अशी माहिती मिळत आहे

संसदेचं पावसाळी अधिवेशन आणि सीजेपीच्या संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या मोर्चामध्ये विरोधी पक्षाचे अनेक नेतेही सहभागी झाले आहेत. आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया, संजय सिंह, आझाद समाज पार्टीचे प्रमुख, खासदार चंद्रशेखर देखील सहभागी झाले आहेत. या व्यक्तीरिक्त अभिनेते प्रकाश राज, सोन वांगचुकी यांची पत्नीही सामील झाली आहे.

खासदार चंद्रशेखर आझाद यांनी म्हटलं की, ‘सरकार त्यांची भूमिका निभावत आहे. तर पोलीस त्यांचं कर्तव्य निभावत आहे. मी धरती मातेप्रति असलेलं कर्तव्य पार पाडत आहे. भारतीय युवा म्हणून मी युवकांचं दु:ख समजू शकतो. मी त्यांचा आवाज होण्यासाठी आणि त्यांना साथ देण्यासाठी आंदोलनात सामील झालो आहे. त्यांच्यासोबत अन्याय होत आहे. सरकार त्यांच्यावर अन्याय होऊ देत आहे.

मेट्रो स्टेशन बंद, इंटरनेट जॅम

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो स्टेशनवर गर्दी झाल्यास मेट्रो स्टेशनची एन्ट्री आणि एग्झिट एन्ट्री बंद करण्याचं योजना आखली आहे. विविध मेट्रो स्टेशनवर पोलिसांची नजर असणार आहे. पोलिसांकडून परिस्थितीनुसार अत्यावश्यक पावले उचलली जाणार आहेत. तर प्रशासनाकडून इंटरनेट जॅम देखील करण्यात आलं आहे.

 

Follow Us