AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP च्या आंदोलनामुळे दिल्लीत हाय अलर्ट; संपूर्ण शहरात 5000 सुरक्षा जवान तैनात, प्रतिबंधात्मक आदेशही लागू

दिल्लीत सीजेपीचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे दिल्ली पोलिसांनी शहरात हायअलर्ट दिला आहे. पोलिसांनाही तैनात केलं आहे.

CJP च्या आंदोलनामुळे दिल्लीत हाय अलर्ट; संपूर्ण शहरात 5000 सुरक्षा जवान तैनात, प्रतिबंधात्मक आदेशही लागू
| Updated on: Jul 20, 2026 | 10:12 AM
Share

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. या अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा धडकणार आहे. या आंदोलनात हजारो तरुण सहभागी होणार असल्याची माहिती मिळतेय. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 5000 हून अधिक सुरक्षा जवानांना तैनात केलं आहे. यात निमलष्करी जवानांचाही समावेश आहे.

कॉकरोच जनता पार्टी राजीनाम्यासाठी आक्रमक 

नवी दिल्लीला 15 सुरक्षा झोनमध्ये विभागण्यात आलं आहे. संसद, इंडिया गेट, VVIP परिसरात पोलिसांचं विशेष लक्ष असणार आहे. दिल्ली पोलिसांनी BNSS च्या 163 कलमांतर्गत प्रतिबंधात्मक आदेशही लागू केले आहेत. कॉकरोच जनता पार्टी नीट पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक झाली आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या ‘संसद मार्च’च्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे पोलीस उपायुक्त सचिन शर्मा यांनी रविवारी एक सूचना जारी करत म्हटलं की, ‘दिल्ली पोलीस हे स्पष्टपणे सांगत आहे की, ‘आमच्याकडे कोणत्याही निषेध मोर्चासाठी परवानगी मागण्यात आलेली नाही. तसेच आम्ही कोणतीही परवानगी दिलेली नाही’.

मोर्चापासून दूर राहण्याचे नागरिकांना पोलिसांचे आवाहन 

पोस्टमध्ये पुढे म्हटलं की, ‘जंतर-मंतर वगळता कोणत्याही ठिकाणी मोर्चा, आंदोलन करू नये. कोणत्याही ठिकाणी आंदोलनासाठी पाच पेक्षा अधिक लोकांच्या एकत्र येण्यास मनाई आहे. त्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे’. दिल्ली पोलिसांनी नागरिकांना आवाहन करत म्हटलं की, नागरिकांनी कायद्याचा आदर करावा. नागरिकांनी मोर्चामध्ये सहभागी होण्यापासून दूर राहावे. शहरात सार्वजनिक शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी सहकार्य करावे, असं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पोलिसांचा शहरात बंदोबस्त 

पोलिसांनी नागरिकांना मोर्चामध्ये सहभागी न होण्याचं आवाहन केलं आहे. तसेच प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन करावे आणि सार्वजनिक शांतता, सुरक्षेसाठी सहकार्य करावे, असं त्यांनी पुढे म्हटलं आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस देखील तैनात करण्यात आले आहेत. बॅरिकेड्स लावले आहेत. महत्त्वाच्या प्रवेशद्वारांवर वाहनांची तपासणी केली जात आहे.  पोलिसांकडून कालपासून सर्वत्र देखरेख केली जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...