Delhi Lal Fort Blast : 5 महत्त्वाचे मुद्दे आणि ‘त्या’ संध्याकाळी नक्की काय घडलं

Delhi Lal Fort Blast : दिल्लीच्या रस्त्यावर उभी असलेली 'ती' कार, अचानक झालेला स्फोट आणि रस्त्यावर पडलेले रक्तबंबाळ अवयव... 'त्या' संध्याकाळी नक्की काय घडलं?

Delhi Lal Fort Blast : 5 महत्त्वाचे मुद्दे आणि त्या संध्याकाळी नक्की काय घडलं
फाईल फोटो
| Updated on: Nov 11, 2025 | 11:07 AM

Delhi Lal Fort Blast : दिल्ली लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात झालेल्या हल्ल्याचा तपास यंत्रणा कसून चौकशी करत आहेत. संपूर्ण दिल्ली आणि भोवतालच्या परिसरांना सकर्तकेचा इशारा देण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली पोलीस कमिश्नर यांच्याकडून माहिती घेतली आहे. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत देखील चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

दिल्ली फायर विभागाचे अधिकारी मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो स्टेशन परिसरात हल्ला झाल्याची माहिती मिळाली… माहिती मिळताच आमची टीम घटनास्थाळी पोहचली आणि जवळपास संध्याकाळी 7.30 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं…

घटना स्थळी पोहोचलेल्या दिल्ली पोलीस कमिश्नर सतीश गोलचा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आज (सोमवार) संध्याकाळी 6.52 वा. कमी वेगात चालणारी एक गाडी थांबली. त्या गाडीमध्ये स्फोट झाला आणि ज्यामुळे आजूबाजूच्या सर्व गाड्यांनी देखील पेट घेतला.. सर्व यंत्रणा FSL, NIA घटना स्थळी दाखल झाल्या… घटनेत काही लोकांचं निधन झालं आहे तर काहींवर उपचार सुरु आहे… एवढंच नाही तर, परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत..’ असं देखील सांगण्यात आलं आहे.

दिल्ली हल्ल्याप्रकरणी 5 महत्त्वाचे मुद्दे…

1 . दिल्ली मधील लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ झालेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 28 जण गंभीर जखमी आहे जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

2. हल्ल्यात जखमी झालेल्या सर्व नागरिकांना दिल्ली येथील एलएनपेजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे… अमित शाह यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आहे.

3. तपासासाठी पोहोचलेल्या पोलिसांच्या एका पथकाने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे काही बोलता येणार नाही… असं सांगण्यात आलं आहे…

4. दिल्ली पोलिसांनी ज्या ठिकाणी हल्ला झालाय ते ठिकाणी आणि आजूबाजूचा सर्व परिसर रिकामा करण्यास सांगितला आहे. घटना स्थळी देखील मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत… परिसरात भीतीचं वातावरण आहे.

5. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी अनेक लोकांच्या शरीराचे अवयव पडलेले दिसत आहे… हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. त्याचप्रमाणे देशातील अनेक ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला आहे.