Dry Day : दारूच्या दुकानातून एका दिवसाला दुकानदाराला किती नफा मिळतो? आकडा ऐकून तुम्ही म्हणाल…..

दिल्लीमध्ये 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी दारूची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे. या दोन दिवसांच्या बंदमुळे सरकारच्या उत्पादन शुल्क महसुलावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Dry Day : दारूच्या दुकानातून एका दिवसाला दुकानदाराला किती नफा मिळतो? आकडा ऐकून तुम्ही म्हणाल.....
delhi liqour shop
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 09, 2026 | 7:54 PM

दारूची दुकान बंद म्हटली की ग्राहकांची गैरसोय होतेच, पण याचा परिणाम सरकारी तिजोरीवरही होतो. 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी दारूच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या दोन दिवसांत दारूची दुकान बंद राहिल्यामुळे सरकारच्या महसूलावर चांगलाच फटका बसण्याचा अंदाज आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकारला जवळपास 40 कोटींचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

दिल्ली सरकारची कमाई किती

दारूची विक्री हा दिल्ली सरकारचा महसुलाचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीत दारूच्या दुकांनांमध्ये दररोज सुमारे 25 कोटी रूपयांची किरकोळ विक्री होते. यापैकी जवळपास 20 कोटी उत्पादन शुल्काच्या स्वरूपात जमा होतात. म्हणजेच दारूच्या दुकानांमधील विक्री आणि सरकारला मिळणार महसूल हे दोन वेगवेगळे आकडे आहेत. दुकानांमधून होणारी एकूण विक्री अधिक असते. तर त्यातील कराच्या माध्यमातून सरकारला महसूल मिळतो.

Loading...

दोन दिवस दुकानं बंद राहिल्याने किती नुकसान होणार

दिल्लीमध्ये 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी दारूची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीतील तत्कालीन परिस्थिती आणि मिळालेल्या माहितीनुसार सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दररोज सुमारे 20 कोटींचा उत्पादन शुल्क महसूल मिळत असल्याच्या अंदाजानुसार, दोन दिवसांच्या बंदमुळे सरकारला जवळपास 40 कोटी रुपयांच्या महसूलावर पाणी सोडावं लागू शकतं. त्याच वेळी दररोजच्या 35 कोटी रूपयांच्या किरकोळ विक्रिच्या अंदाजानुसार दोन दिवसांत सुमारे 70 कोटी रूपयांची विक्री होऊ शकणार नाही.

मात्र हे आकडे रोजच्या सरासरी विक्रीवर आधारित अंदाज आहेत. प्रत्यक्ष महसूलातील घट किती असेल, हे ग्राहकांची मागणी आणि बंदीनंतर होणार्‍या खरेदीवरही अवलंबून असेल.

वर्षभरात किती महसूल मिळतो?

2026-27 या आर्थिक वर्षासाठी दिल्ली सरकारने उत्पादन शुल्कातून 7,200 कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. मागील आर्थिक वर्षात म्हणजे 2025-26 मध्ये सरकारला या विभागातून सुमारे 7,148 कोटी रुपयांचा महसूल मिळाला.

सणासुदीच्या काळात दारूची मागणी वाढल्यास विक्री आणि महसूलातही वाढ होऊ शकते. दिवाळीपूर्वी एका दिवसात 61.56 कोटी रूपयांचा उत्पादन शुल्क महसूल मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे विक्रिच्या प्रमाणानुसार सरकारच्या कमाईत दिवसागणिक वाढ होते.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us