Police Death Video : उभं रहाता येत नव्हतं एवढा आजारी तरी ट्रेनिंगला बोलवलं, घरचे आले तर त्यांना पळवलं, शेवटी मृत्यूनं गाठलं, पोलीस ट्रेनिंगची ह्रदयद्रावक कहाणी

दिल्ली पोलिसांनी याबाबत एक ट्विट केले आहे. आमच्या वजिराबाद प्रशिक्षण केंद्रात एका प्रशिक्षणार्थी जेल वॉर्डनचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

Police Death Video : उभं रहाता येत नव्हतं एवढा आजारी तरी ट्रेनिंगला बोलवलं, घरचे आले तर त्यांना पळवलं, शेवटी मृत्यूनं गाठलं, पोलीस ट्रेनिंगची ह्रदयद्रावक कहाणी
पोलीस ट्रेनिंगची ह्रदयद्रावक कहाणी
Image Credit source: twitter
| Updated on: May 22, 2022 | 11:02 AM

नवी दिल्ली : दिल्ली पोलिस अकादमीतील (Delhi Police Academies) प्रशिक्षणार्थी तुरुंग वॉर्डनचा मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. ही घटना 18 मे रोजी घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 मे रोजी दुपारी 4 च्या सुमारास पोलीस अकादमीमध्ये भरती झालेल्या तुरुंग वॉर्डनचे प्रशिक्षण घेत असताना प्रशिक्षणार्थीची अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, उपचारापूर्वीचं त्याचा मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांना ही माहिती कॉलद्वारे माहिती देण्यात आली असे एका अधिकाऱ्याने सांगितले. नंतर तिथल्या प्रशिक्षणार्थी तुरुंग वॉर्डन (Jail warden) व्हिडीओ व्हायरल (Video viral) झाला आहे. त्यामध्ये अकादमीची स्थिती दयनीय आहे. तसेच तिथ कसल्याही प्रकारची व्यवस्था नाही. आजारी असताना एका तुरुंग वॉर्डनला जबरदस्तीने प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. तो आजारी असल्याने त्याचे कुटुंबिय त्याला घ्यायला आले होते. परंतु त्यांना देखील शिवीगाळ करून इथून हाकलून देण्यात आलं अशी खंत व्हिडीओत प्रशिक्षणार्थी पोलिसांनी व्यक्त केली आहे.

नेमकं काय आहे व्हि़डीओत

“त्यांच्या परवानगीची गरज नाही, कुणाला भेटण्यासाठी असं म्हणत एक जवान गेटमधून आत येत असल्याचं पाहायला मिळत आहे. जे काही बोलायचं आहे, ते इथेचं बोला. एक जवान आजारी होता. प्रशिक्षण केंद्रात मागच्या एक आठवड्यापासून पाणी नाही. प्रशिक्षण घेत असलेली मुलं आजारी पडत आहेत. त्यांची कसल्याही प्रकारची व्यवस्था नाही. चांगल्या रूग्णालयात आमच्यावर उपचार केले जात नाहीत. ही मुलं भरती झालेली आहेत. अशाचं कोणत्यातरी सरकारी रूग्णालयात पाठवलं जात आहे. सकाळी चार वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत प्रशिक्षण सुरू असतं. मृत्यू झालेल्या मुलाची तीन दिवसापासून तब्येत खराब होती. त्याच्यावरती कसल्याची पद्धतीचे उपचार करण्यात आले नाहीत. आज त्या मुलाला सकाळी उभे राहता येत नव्हते. त्याला जबरदस्तीन मैदानावरती बोलावण्यात आलं. तसेच त्याचे आईवडिल आले होते त्याला घ्यायला. त्यांनी देखील हात जोडले होते. त्यांना शिव्या देऊन पळवून लावलं. कुठल्या माणुसकी सारखा हा व्यवहार नाही. तिथं तो मुलगा आला त्यावेळी त्यांच्या काकाला धमकावलं गेलं. त्या मुलाचा मृत्यू झाला. इथं कसल्याही प्रकारची व्यवस्था नाही. इथं सगळ्या गोष्टींचा भ्रष्टाचार सुरू आहे. पंधरा मुलं राहण्याची व्यवस्था आहे, त्या रूममध्ये पंचवीस मुलांना एकत्र ठेवलं जात आहे. कसलीही आंधोळीची व्यवस्था नाही. त्या जवानाचा इथे तडतडून मृत्यू झाला. त्यांची घरात एक वयोवृध्द आई आहे. त्याचबरोबर त्याला वडील नाही आहेत असं त्या व्हायरल व्हिडीओत जवानाने खंत व्यक्त केली आहे.

दिल्ली पोलिस करत आहेत कसून चौकशी

दिल्ली पोलिसांनी याबाबत एक ट्विट केले आहे. आमच्या वजिराबाद प्रशिक्षण केंद्रात एका प्रशिक्षणार्थी जेल वॉर्डनचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्याकडून परिस्थितीची चौकशी केली जात आहे आणि स्थानिक पोलिसही कायद्यानुसार कार्यवाही करत आहेत अशी प्राथमिक माहिती समजली आहे.