Delhi Blast : दिल्लीमधला स्फोट नव्हे दहशतवादी हल्ला? पोलिसांकडून धक्कादायक माहिती, मोठी अपडेट समोर

दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात घडलेल्या वाहनाच्या स्फोटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या घटनेनंतर एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून हा दहशतवादी हल्ला असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

Delhi Blast : दिल्लीमधला स्फोट नव्हे दहशतवादी हल्ला? पोलिसांकडून धक्कादायक माहिती, मोठी अपडेट समोर
delhi red fort blast
| Updated on: Nov 10, 2025 | 9:14 PM

Delhi Red Fort Blast : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात घडलेल्या वाहनाच्या स्फोटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या घटनेनंत एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. तशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आज (10 नोव्हेंबर) संध्याकाळी 6 वाजून 45 मनिटांनी एका व्हॅनमध्ये हा स्फोट झाला होता. हा स्फोट झाल्यानंतर इतरही आठ ते दहा कारमध्ये स्फोट झाला. यात आतापर्यंत एकूण दहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले असून त्यांच्यावर वेगवेगल्या रुग्णालयात उपचार चालू आहेत. स्फोटाची ही माहिती मिळताच महाराष्ट्रात मुंबई, पुणे शहरातील पोलीस हायअलर्टवर आहेत.

स्फोट नव्हे तर दहशतवादी हल्ला?

दिल्लीमध्ये गर्दीच्या मानल्या जाणाऱ्या लाला किल्ला परिसरात हा स्फोट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका व्हॅनमध्ये हा स्फोट झाला. हा स्फोट झाला तेव्हा वाहनाची बॅटरी फुटली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातह होता. मात्र आता पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासातून काही प्रथमदर्शनी अंदाज लावले आहेत. हा कारचा स्फोट नसून दहशतवादी कट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता दहशतवादी हल्ला्याचा अंगानेही या घटनेचा तपास केला जाणार आहे.

दिल्ली पोलीस सक्रिय, पुरावे जमा करण्याचे काम सुरू

या स्फोटात आतापर्यंत एकूण दहा जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना घडल्यानंतर एनआयए, बॉम्बशोधक पथक, अग्निशामक दल तसेच इतर सर्व तपाससंस्था घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळावरचे पुरावे जमा केले आहेत. या पुराव्यांचा अभ्यास करून स्फोटाचे नेमके कारण काय याचा शोध घेतला जाणार आहे.

पोलिसांनी नेमके काय सांगितले?

दरम्यान, मिळालेल्या ताज्या माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. ही घटना समोर येताच वरिष्ठ पोलिसांनही घटनास्थळी धाव घेतली. यातीलच एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नेमका स्फोट कसा झाला? याबाबत सविस्तर सांगितले आहे. ‘स्फोट झालेली गाडी अगदी हळूहळू पुढे जात होती. रस्त्यावर सिग्नल लागल्यानंतर ही गाडी थांबली. या गाडीमध्ये काही प्रवासीही होते. याच गाडीमध्ये स्फोट झाला. या स्फोटामुळे गाडीच्या आजूबाजूच्या गाड्यांमध्येही स्फोट झाला. ही घटना समजताच पोलीस, एनआयए, एनएसजी तसेच इतर सर्व तपाससंस्था घटनास्थळी दाखल झाल्या,’ अशी माहिती या पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.