भारतातील सर्वात मोठ्या कोव्हिड सेंटरमध्ये आता परदेशी रुग्णांवर उपचार; वाचा नेमकं काय घडलं?

| Updated on: Jan 12, 2021 | 3:55 PM

आता देशातील कोरोना रुग्णांची संख्या बरीच घटल्याने या कोव्हीड सेंटरमध्ये रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. | Delhi's Sardar Patel COVID centre starts admitting foreigners people

भारतातील सर्वात मोठ्या कोव्हिड सेंटरमध्ये आता परदेशी रुग्णांवर उपचार; वाचा नेमकं काय घडलं?
Follow us on

नवी दिल्ली: अगदी काही महिन्यांपूर्वी कोरोना (Coronavirus) रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे भयावह परिस्थिती असणाऱ्या दिल्लीतील चित्र आता पूर्णपणे बदलले आहे. कोरोनाची साथ शिखरावर असताना दिल्लीच्या छत्तरपूर येथे सरदार पटेल कोव्हीड सेंटर स्थापन करण्यात आले होते. इंडो-तिबेटीयन सीमा पोलिसांकडून (ITBP) भारतातील हे सर्वात मोठे कोव्हीड सेंटर चालवले जात होते. (Sardar Patel COVID centre starts admitting foreigners people coming from abroad)

मात्र, आता देशातील कोरोना रुग्णांची संख्या बरीच घटल्याने या कोव्हीड सेंटरमध्ये रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला 600 डॉक्टर्स असलेल्या या कोव्हीड सेंटरमध्ये अवघे 60 रुग्ण आहेत. त्यामुळेच आता केंद्र सरकारने या कोव्हीड सेंटरमध्ये परदेशी रुग्णांवर उपचार करायचे ठरवले आहे. आतापर्यंत या कोव्हीड सेंटरमध्ये दुबई, नेदरलँडस, जपान, मलेशिया आणि कॅनडातून आलेल्या कोरोनाच्या रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.

यापूर्वी सरदार पटेल कोव्हीड सेंटरमध्ये दिल्लीतील रुग्णांना दाखल केले जात होते. कोरोनाची साथ शिखरावर असताना याठिकाणी जवळपास 600 आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाची साथ ओसरल्यामुळे या सेंटरमध्ये अवघे 60 रुग्ण उरले आहेत.
त्यामुळे आता याठिकाणी परेदशी रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्याच्या घडीला या कोव्हीड सेंटरमध्ये सौदी अरेबियातील 8, दुबईतील 4, कॅनडातील 3 आणि अमेरिका, जपान, मलेशिया, नेदरलँडस व म्यानमारमधून आलेल्या एका रुग्णावर उपचार सुरु आहे. तसेच कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटल्याने आता या कोव्हीड सेंटरमधील आरोग्य कर्मचाऱ्यांचेही प्रमाण टप्याटप्प्याने कमी करण्यात येईल.

सात महिन्यांतर देशात कोरोनाचे सर्वाधिक कमी रुग्ण

तब्बल सात महिन्यानंतर भारतात बुधवारी नव्या कोरोना रुग्णांची सर्वाधिक कमी संख्या नोंदवण्यात आली. गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 12,584 रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1,04,79,179 इतकी झाली आहे.

16 तारखेपासून लसीकरणाचं महाअभियान

पहिल्या टप्प्यात 3 कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे, अशी माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) दिली होती. पहिल्या टप्प्यात 3 कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार असून, दुसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील आणि 50 वर्षांखालील को-मॉर्बिट व्यक्तींचा समावेश करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या:

अवघ्या चार दिवसात भारतात कोरोनावरील लसीकरणास सुरुवात, संपूर्ण जगाचं भारताकडे लक्ष

(Sardar Patel COVID centre starts admitting foreigners people coming from abroad)