AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जम्मू-काश्मीरमध्ये बैसाखी यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना, नदीवरील पूल तुटल्याने हाहाकार

बैसाखी यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. मंदिरात जाण्यासाठी नदीवर एक लोखंडी पूल होता. या पुलावरुन नदी ओलांडून भाविक मंदिरात चालले होते. इतक्यात अचानक जे घडले त्याने एकच हाहाकार उडाला.

जम्मू-काश्मीरमध्ये बैसाखी यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना, नदीवरील पूल तुटल्याने हाहाकार
बैसाखी यात्रेदरम्यान पूल दुर्घटनाImage Credit source: Social
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Apr 14, 2023 | 6:06 PM
Share

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात बैसाखी यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. यात्रेदरम्यान नदीवरील लोखंडी पूल तुटल्याने एकच हाहाकार उडाला. अपघातात 20 हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती तात्काळ स्थानिक पोलीस-प्रशासनाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना पुलाखालून बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेचा व्हि़डिओही व्हायरल झाला आहे.

ओव्हरलोडमुळे पूल कोसळला

चेनानी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेनी संगम मंदिरात बैसाखी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक आले होते. नदीवरील पूल ओलांडून मंदिरात जावे लागते. या नदीवर जुना लोखंडी पूल होता. यात्रेला आलेल्या भाविकांची पुलावर मोठी गर्दी झाली होती. आधीच कमकुवत झालेला पूल भक्तांच्या गर्दीमुळे खाली कोसळला. पुलाच्या मध्यावरच भेग पडली आणि पूल जमीनदोस्त झाला.

आतापर्यंत 20 जखमी झाल्याची माहिती

या दुर्घटनेत पुलावरील भाविक नदीत पडून जखमी झाले. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, आतापर्यंत 20 जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि मदत पथकाकडून अद्याप बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेचे व्हिडिओही समोर आला आहे. ओव्हरलोडिंगमुळे पूल कोसळल्याचे उधमपूर जिल्ह्याधिकाऱ्यांनी सांगितले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाही.

Follow Us
एकटीने पोलिसांची व्हॅन रोखणाऱ्या रिया अहिरबाबत मोठी अपडेट समोर, आक्षेप
एकटीने पोलिसांची व्हॅन रोखणाऱ्या रिया अहिरबाबत मोठी अपडेट समोर, आक्षेपार्ह...
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट! पेपर फुटलाच नव्हता; ती तक्रार...
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट! पेपर फुटलाच नव्हता; ती तक्रार खोटी?
24 तासांत E-20 जनता पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स
E 20 Janata Party | E-20 विरोधात जनआक्रोश! 24 तासांत E-20 जनता पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष तयारी, बेड नेते भेटीला पोहोचले
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष तयारी, बेड नेते भेटीला पोहोचले
37 सेकंदांचा व्हिडिओ अन् सोशल मीडियावर संतापाची लाट; सोयाबीन चाप...
Viral Video | 37 सेकंदांचा व्हिडिओ अन् सोशल मीडियावर संतापाची लाट; सोयाबीन चाप बनवण्याची घाणेरडी पद्धत उघड
दिल्लीत हालचाली वाढल्या! वकीलांसोबतच्या चर्चेत मोठा निर्णय? अभिजीत
दिल्लीत हालचाली वाढल्या! वकीलांसोबतच्या चर्चेत मोठा निर्णय? अभिजीत दीपकेच्या भेटीगाठी सुरुच
AK-47 ने आंदोलनकर्त्यांवर गोळीबार, मोदींचं आश्वासन कुठं गेलं? हे सरकार
Rahul Gandhi | AK-47 ने आंदोलनकर्त्यांवर गोळीबार, मोदींचं आश्वासन कुठं गेलं? हे सरकार खोटं आहे; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल
महत्त्वाच्या विधेयकाची प्रस्तावना अजून प्रलंबित, अधिवेशनाच्या दुसऱ्या
महत्त्वाच्या विधेयकाची प्रस्तावना अजून प्रलंबित, अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातही मोठा गोंधळ
पेपर सेट करणाऱ्याचा प्रमुख आका कोण?; रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत...
Rohit Pawar | पेपर सेट करणाऱ्याचा प्रमुख आका कोण?; रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत मांडले धक्कादायक दावे
10 वर्षांचा तुरुंगवास, 10 कोटी रुपयांपर्यंत दंड अन्... परीक्षा सुधारणा
10 वर्षांचा तुरुंगवास, 10 कोटी रुपयांपर्यंत दंड अन्... परीक्षा सुधारणा विधेयकामध्ये नेमकं काय काय?