ट्राममध्ये भेटले अन् प्रेमात पडले; काय आहे ध्रुव राठी आणि जूलीची लव्हस्टोरी?

युट्यूबर ध्रुव राठीची पत्नी जूली एलबीआर-राठी ही एक जर्मन कंटेट क्रिएटर आणि हेल्थकेअर प्रोफेशनल आहे. जर्मनीमध्ये भेटलेल्या या जोडप्याने ७ वर्षांच्या डेटिंगनंतर २०२१ मध्ये लग्न केले. बॉलिवूड अभिनेत्रीला टक्कर देणाऱ्या जूलीची ध्रुवसोबतची ट्राममधील अनोखी लव्ह स्टोरी, त्यांचे प्रवास प्रेम आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्या.

ट्राममध्ये भेटले अन् प्रेमात पडले; काय आहे ध्रुव राठी आणि जूलीची लव्हस्टोरी?
Julie Rathee
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 12, 2026 | 3:28 PM

युट्यूबर ध्रुव राठी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सीजेपीच्या आंदोलनापूर्वीच गुरुग्राममध्ये ध्रुवला घरातूनच ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर त्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. ध्रुवला त्याचे हटके व्हिडीओ आणि त्यावरील त्याच्या सडेतोड मतांसाठी लोक ओळखतात. ध्रुव राठी हा सध्या जर्मनीत राहतो. त्याची पत्नी जूली ही सुद्धा जर्मनीत असते आणि ती ट्रॅव्हल ब्लॉग बनवते. याशिवाय त्यांचा ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मही आहे. जूली ध्रुव राठीच्या प्रत्येक कामात मदत करत असते. त्यामुळे जूलीबाबतची सर्वांनाच उत्सुकता आहे. जूली कोण आहे? काय करते? दोघांची लव्ह स्टोरी काय आहे? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

ध्रुव राठीच्या बायकोचं नाव जूली आहे. दोघांची भेट जर्मनीत झाली होती. दोघानीही 2021 मध्ये लग्न केलं होतं. ध्रुव आणि जूली कधी कधी ट्रॅव्हल आणि खासगी आयुष्याबाबतच्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतात. सप्टेंबर 2024मध्ये त्यांना एक मुलगा झाला आहे.

Loading...

ट्राममध्ये फुलली लव्ह स्टोरी

जूलीचं पूर्ण नाव जूली एलबीआर-राठी आहे. जूली जर्मन नागरिक आहे. तिथेच तिचं शिक्षण झालंय. हेल्थकेअर प्रोफेशनल सोबतच त्या कंटेट क्रिएटरही आहेत. दोघांची पहिली भेट 2014मध्ये जर्मनीत झाली होती. ध्रुव जर्मनीत इंटर्नशीपसाठी आलेला असताना ही भेट झाली होती. विशेष म्हणजे ट्राममध्ये दोघांची भेट झाली होती. रोज ट्राममधून प्रवास करतानाच त्यांची लव्ह स्टोरी फुलली.

सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं. जूली आणि ध्रुवला दोघांनीही फिरायला खूप आवडते. सतत नवीन ठिकाणं एक्सप्लोअर करणं दोघांना आवडतं. जूली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. इन्स्टावर तर ती सर्वाधिक अॅक्टिव्ह आहे. इन्स्टावर तिचे 387K फॉलोअर्स आहेत. सौंदर्याच्या बाबतीत एखाद्या मॉडल आणि अभिनेत्रीपेक्षा जूली काही कमी नाहीये.

हरियाणा ते जर्मनी

ध्रुव राठीचा जन्म हरियाणाचा. त्याने मेकॅनिकल इंजीनिअरिंगमध्ये शिक्षण घेतलंय. पुढील शिक्षणासाठी तो जर्मनीला गेला होता. तिथे कार्लजूए इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून रिन्यूएबल एनर्जीमध्ये त्याने मास्टर डिग्री घेतली. शिक्षण घेत असतानाच त्याला व्हिडीओ तयार करण्याची आणि एखादा विषय सोप्या भाषेत समजावून सांगण्याची आवड निर्माण झाली. लोकांना समजेल अशा भाषत शिकवलं पाहिजे, असं त्याचं म्हणणं आहे.

त्यानंतर त्याने हळूहळू यूट्यूबवर आपली ओळख निर्माण केली. तो राजकारण, समाजकारण, पर्यावरण आणि इतर मुद्द्यांवर व्हिडीओ बनवतो. कोणताही मुद्दा सोप्या भाषेत लोकांना समजावून सांगण्यावर त्याचा भर असतो. अत्यंत रंजकपणे आणि माहितीपर व्हिडीओ बनवल्याने ते अधिक व्हायरल होतात. तसेच केंद्र सरकारवर सडेतोड भाषेत टीका करत असल्यानेही तो अधिक लोकप्रिय आहे.

जर्मनीत राहतो

ध्रुव राठी गेल्या बऱ्याच काळापासून जर्मनीत राहत आहे. त्याच्या सोशल मीडिया पोस्ट आणि व्हिडीओतून त्याच्या आयुष्याची झलक नेहमी पाहायला मिळते. कामासोबत प्रवास करणं त्याला आवडतं. त्याच्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये वेगवेगळी ठिकाणे, तिथले खाद्यपदार्थ आणि फिरण्याचा अनुभव मांडलेला असतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us