Dlimitation Bill : राहुल गांधी पवारांच्या भेटीसाठी मुंबई दाखल…काय घडामोडी..
विरोधी पक्ष नेते राहुल गांधी चेन्नईवरुन मुंबई दाखल झाले आहेत. त्यांचे मुंबईच्या विमानतळावर आगमन झाले आहे. डिलिमिटीशन बिलाचे उद्या संसदेत सादरीकरण होणार असून त्यावर चर्चेला सुरुवात होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी त्यांच्या इंडिया आघाडीच्या सहकाऱ्यांची मनधरणी करण्यासाठी मुंबईत आले आहेत. आधी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी तसेच मल्लिकार्जून खरगे यांनी चेन्नईत एम.के.स्टॅलिन यांची भेट घेऊन त्यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता.

विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज दुपारी आधी चेन्नईला जाऊन माजी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांची भेट घेतली होती. त्यांना त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ८५० खासदारांचा आकडा लोकशाहीसाठी विनाश ठरणार असून तामिळ संस्कृती, भाषेवर हा भाजपाचा हल्ला ठरेल असे आपण स्टॅलिन यांना सांगितल्याचे म्हटले होते. त्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईकडे प्रयाण होते. आता राहुल गांधी मुंबईतील विमानतळावर उतरले तेव्हा त्यांच्यासोबत इंडिया आघाडीचे नेते त्यांच्यासोबत होते.
एकाच बसमध्ये सर्व नेते…
आता रात्री 8 वाजता ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये शरद पवार यांची भेट घेण्यासाठी इंडिया आघाडीचे नेते मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे, ममता बॅनर्जी , आदित्य ठाकरे सगळे एकाच विमानाने मुंबईत आले आहेत. शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. परंतू राष्ट्रवादी पक्षाने डिलिमिटीशन बिलला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे. उद्या सकाळी 9 वाजता दिल्लीत NCP ची बैठक, आणि उद्याच संसदेत बिल सादर होणार. ही मनधरणी यशस्वी होते का, की अमित शाहांनी जुळवलेलं गणित कायम राहतं की नाही ? हे आता उद्या समजणार आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.