
तुम्ही अनेकदा अनुभव घेतला असेल, जेव्हा तुम्ही बाईक चालवता किंवा कार चालवता तेव्हा तुमच्या गाडीमागे कुत्रे धावतात. अनेकदा गाडीमागे कुत्रे धावत असल्यामुळे किंवा गाडी समोर कुत्रं आल्यानं भीषण अपघात झाल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. कुत्रे गाडीच्या मागे लागल्यानंतर भीतीमुळे आपला गोंधळ उडतो. एकतर आपण गाडीचा वेग आणखी वाढवतो किंवा गाडीचं ब्रेक दाबतो, मात्र अशा स्थितीमध्ये आपलं गाडीवरील नियंत्रण सुटून मोठा अपघात होण्याची शक्यता असते. तुम्ही कधी हा विचार केला आहे का? की कुत्रे गाडीच्या मागे का लागतात?
कुत्रे गाडीच्या मागे का लागतात?
याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तुमची गाडी पार्किंगमध्ये उभी असते, तेव्हा कुत्रे गाडीच्या चाकावर लघवी करतात. इतर प्राणी असतात जसं वाघ वगैरे यांचा एक विशिष्ट एरिया ठरलेला असतो, त्यांना आपल्या जागेवर दुसरं कोणी अतिक्रमण केलेलं आवडत नाही, तसंच कुत्र्यांचं देखील आहे, ते आपल्या परिसरात दुसऱ्या अनोळखी कुत्र्याला येऊ देत नाहीत. दरम्यान कुत्र्यानं बाईक किंवा कारच्या चाकावर लघवी केल्यामुळे होतं काय तर त्या विशिष्ट वासामुळे तुम्ही ज्या मार्गानं जातात तेथील कुत्र्याला आपल्या परिसरात नवा कुत्रा आल्याचा भास होतो, आणि ते तुमच्या गाडीच्या मागे लागतात. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या गाडीचा वेग हा जास्त असल्यास जास्त वेग देखील कुत्र्याला आकर्षित करतो.
उपाय काय करावा?
तुमच्या गाडीमागे कुत्रं लागू नये यासाठी तुम्ही ही ट्रीक करू शकता, जेव्हा तुम्हाला कुठे बाहेर फिरायला जायचं आहे, तेव्हा मार्केटमध्ये दोन रुपयांमध्ये छोटी शॉप्मूची पुडी भेटते ती विकत घ्या, आणि तिने आपल्या वाहनाचे टायर स्वच्छ धुवा किंवा शाम्पू लावलेल्या फडक्यानं चाकं पुसून काढा, या ट्रीकनंतर कुत्रा तुमच्या कधीच मागे लागणार नाही. तसेच रात्रीच्या अंधारात देखील अनेकदा कुत्रे गाडीच्या मागे लागतात, ते टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या बाईकला किंवा कारला रेडियमची नंबर प्लेट बसू शकता. कुत्रे असलेल्या परिसरात गाडीचा वेग नियंत्रीत ठेवा. यामुळे कुत्रे तुमच्या गाडीचा कधीच पाठलाग करणार नाहीत.