उंचावरून पडणं, पाठलाग करणं … अशी स्वप्नं पडतात? घाबरू नका, त्यामागे दडलेले हे खास संकेत जाणून घ्या
स्वप्नात पूराचं नदी, समुद्र किंवा मृत व्यक्ती दिसल्यास अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतात. ती स्वप्न का पडतात. त्यांचा अर्थ काय, तशी स्वप्न मलाच का पडतात? जाणून घ्या

स्वप्नात उंचावरून पडताना दिसणे : हे स्वप्न तुमच्या आयुष्यातील अनिश्चितता ताणतणाव आणि एखाद्या परिस्थितीवरील नियंत्रण सुटल्याची भावना दर्शवत या स्वप्नातून प्रत्येक गोष्ट नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा परिस्थितीवर विश्वास ठेवण्याचा संदेश देत असतो.
पाठलाग करताना दिसणं : स्वप्नात कोणीतरी पार्टनर पाठलाग करताना दिसल्यास खऱ्या आयुष्यात कोणतीतरी गोष्ट टाळतोय याची जाणीव ते स्वप्न करून देतात. जबाबदारी, भीती अपूर्ण राहिलेली गोष्ट पूर्ण करण्याचे संकेत यात मिळतात.
स्वप्नात दात पडताना : स्वप्नात दात पडताना दिसणे हे टीकेची भीती वाटणे. आत्मविश्वास कमी होणे यामुळे, दात पडण्याची स्वप्ने पडू शकतात पण ही स्वप्ने जुन्या गोष्टी मागे टाकून नवीन गोष्टी स्वीकारायला हव्या किंवा नवी संधी मिळू शकते याचा संदेश असतो.
स्वप्नात समुद्र किंवा नदीचा पुराचे पाणी दिसणे : नदीचं पाणी शांत मनातील शांतता दर्शवत. तर खवळलेला समुद्र किंवा पूर ताण आणि अस्वस्थता दर्शवतो मनात लपलेल्या भावनांकडे लक्ष द्या वेळोवेळी व्यक्त व्हा. त्यामुळे मनाला शांतता मिळते.
स्वप्नात मृत व्यक्तींची भेट होणं : मृत व्यक्ती स्वप्नात दिसणे या भावनिक क्षण असतो त्यामागे संबंधित व्यक्तीच्या आठवणी प्रेम आधार संतवन अशा अनेक गोष्टी लपलेल्या असतात काही जणांसाठी हा सुरक्षेचा किंवा एकटे असल्याचा संदेश असतो
या स्वप्नांना घाबरू नका : असे स्वप्न नेहमीच काही ना काही सुचवत असतात असं नाही या स्वप्नांवर भावना अनुभवता नावाने दिवसभरातील विचारांचा प्रभाव असू शकतो
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.