AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti: मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी पालकांनी लक्षात ठेवाव्यात चाणक्यांच्या या ५ गोष्टी; आयुष्यात मिळेल यश

Chanakya niti, Chanakya neeti, Chanakya niti in marathi, acharya Chanakya, Chanakya niti for parents, kids success, चाणक्य नीती, आचार्य चाणक्य, पालकांसाठी चाणक्य नीती, मुलांच्या यशासाठी चाणक्य नीती,

Chanakya Niti: मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी पालकांनी लक्षात ठेवाव्यात चाणक्यांच्या या ५ गोष्टी; आयुष्यात मिळेल यश
Chanakya neetiImage Credit source: टीव्ही९ मराठी
| Edited By: | Updated on: Nov 24, 2026 | 9:06 PM
Share

आपलं मूल मोठं होऊन यशस्वी व्यक्ती व्हावं, अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. त्यासाठी पालक मुलांना चांगले शिक्षण देण्यासोबतच त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याचाही प्रयत्न करतात. मात्र, यशस्वी होण्यासाठी केवळ शिक्षण पुरेसे नसते. मुलांमध्ये योग्य सवयी, आत्मविश्वास आणि चांगले गुण विकसित होणेही तितकेच महत्त्वाचे असते. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीमध्ये मुलांच्या संगोपनाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. मुलांना यशस्वी बनवण्यासाठी पालकांनी कोणत्या गोष्टी शिकवाव्यात, जाणून घेऊया.

मुलांना द्या भरपूर प्रेम

आचार्य चाणक्य यांच्या मते, मुलांचे संगोपन नेहमी पूर्ण प्रेमाने आणि काळजीने केले पाहिजे. मुलांना घरात असे वातावरण दिले पाहिजे की त्यांना नेहमी सुरक्षित वाटेल आणि त्यांचे पालक त्यांच्यावर किती प्रेम करतात याची त्यांना जाणीव होईल. प्रेमाच्या आणि काळजीच्या वातावरणात जेव्हा मुलांचे संगोपन होते, तेव्हा मुले कोणाचीही भीती न बाळगता आपले जीवन मोकळेपणाने जगतात आणि अशी मुले त्यांच्या आयुष्यात नक्कीच पुढे जातात.

सर्वांचा आदर करायला शिकवा

चाणक्य नीतीनुसार मुलांना नेहमी प्रत्येकाचा आदर करायला शिकवले पाहिजे. मुलांना गुरू, आई-वडील, वडीलधारे तसेच स्वत:पेक्षा लहान आणि स्वत:पेक्षा कमकुवत असलेल्यांचा आदर करायला शिकवले पाहिजे. इतरांचा आदर करणाऱ्या लोकांना सर्वत्र मान मिळतो आणि अशा लोकांच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले जाते. त्यामुळे मुलांना लहानपणापासूनच लोकांचा आदर करायला शिकवायला हवं.

समजवा योग्य आणि अयोग्य यातील फरक

आचार्य चाणक्य यांच्या मते मुलांना लहानपणापासूनच योग्य-अयोग्य, धर्म आणि अधर्म शिकवायला हवा. मुलांना लहानपणापासूनच नैतिकतेचे धडे दिले जातात, तेव्हा अशी मुले पुढे चांगल्या चारित्र्याची माणसे बनतात आणि आपल्या घराचे, कुटुंबाचे, आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करतात.

मुलांना बनवा आज्ञाधारक

चाणक्य नीतीनुसार मुलांना यशस्वी माणूस बनवण्यासाठी लहानपणापासूनच त्यांना आज्ञाधारक होण्यास शिकवा. मोठ्यांच्या शब्दांचा आदर करून त्यांचे पालन करावे, हे मुलांना शिकवणे हे पालकांचे कर्तव्य आहे. पण त्याचबरोबर मुलांना योग्य-अयोग्य शिकवणंही गरजेचं आहे. मोठ्यांच्या चुकीच्या बोलण्यातही मुलांना हो म्हणायला शिकवू नका. चुकीच्या गोष्टीला नाही म्हणणंही गरजेचं आहे.

नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रोत्साहित करा

यशस्वी व्यक्ती होण्यासाठी नवीन गोष्टी शिकण्याची तळमळ असणं खूप गरजेचं आहे. मुलं मोठी होत असताना त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. ते आपल्या पालकांना प्रत्येक गोष्टीशी संबंधित प्रश्न विचारत असतात. अशा वेळी पालकांनी संयमाने मुलाच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे आणि त्यांना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करावे. असे केल्याने मुलांमध्ये काहीतरी नवीन शिकण्याचा उत्साह कायम राहील.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचं विधान...
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद देण्याची तयारी