AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

47 च्या धर्मेंद्रंचा 20 वर्षांच्या हिरोईनसोबत रोमान्स, 43 वर्ष जुन्या चित्रपटाची सर्व पाचही गाणी सुपरहिट

1983 मध्ये आलेल्या धर्मेंद्र यांच्या ‘नौकर बीवी का’ सिनेमा पुन्हा चर्चेमध्ये आला आहे. 47 वर्षांच्या धर्मेंद्र यांच्यासोबत 20 वर्षांच्या अभिनेत्री झळकल्या होत्या. अवघ्या 2 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने मोठी कमाई केली होती. सिनेमातली पाचही गाणी सुपरहिट ठरलेली.

47 च्या धर्मेंद्रंचा 20 वर्षांच्या हिरोईनसोबत रोमान्स, 43 वर्ष जुन्या चित्रपटाची सर्व पाचही गाणी सुपरहिट
dharmendra naukar biwi ka movieImage Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 24, 2026 | 9:08 PM
Share

1993 साली आलेला एक बॉलिवूड चित्रपट त्याच्या स्टारकास्टमुळे गाजला होता. या सिनेमामध्ये अभिनेता धर्मेंद्र मुख्य भूमिकेत होते. तर त्यांच्यासोबत अतिशय कमी वयाची तरुण अभिनेत्री कास्ट करण्यात आली होती. होय, हा सिनेमा म्हणजे नौकर बीवी का. या सिनेमांचं कथानक अतिशय उत्कंठा वाढवणारं होतं. त्यामध्ये पटकथेत अनेक विनोदी लेखन आणि अप्रतिम गीत संगीतही होतं. धर्मेंद्र सोबत या सिनेमामध्ये राज बब्बर आणि अनिता राज यांनीही कामे केली होती. त्यावेळी अंदाजे दोन कोटी रुपये खर्चुन हा सिनेमा बनवण्यात आला होता.

हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरही चांगला गाजला होता. सिनेमाने त्याकाकाळात हिट कमाई केली होती. जवळपास 9 कोटी रुपयांनी कमाई करणारा हा सिनेमा अनेक गाण्यांममुळेही सुप्रसिद्ध आहे. या सिनेमातील सर्वच्या सर्व गाणी प्रसिद्ध आणि सुपरहिट ठरली होती. या सिनेमांचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे अभिनेते धर्मेंद्र हे एक मोठे (वयानेही 47) स्टार होता तर अनित राज या खूप तरु वयात त्यांच्यासोबत दिसली होती.

दरम्यान, असं असलं तरी नौकर बीवी का हा सिनेमा प्रचंड गाजला. राजकुमार कोहली यांनी सिनेमांचं दिग्दर्शन केलेलं. धर्मेंद्र यांनी दीपक कुमार तर रिना रॉय यांनी संध्या अनिता राज यांनी ज्योतीनाथ उर्फ राणी यांची भूमिका निभावलेली.याशिवाय या सिनेमामध्ये राज बब्बर. कादर खान. प्राण, ओमप्रकाश, विनोद मेहरा, आणि एके हंगलही झळकळलेले. पण सर्वाधिक लक्ष वेधलेलं ते धर्मेंद्र आणि २० वर्षीय अनिता राज या जोडीने. हा सिनेमा एक ब्लॉकबस्टर कॉम्बिनेशन होता.

बप्पी लाहिरींची जादू, पाचही गाणी सुपरहिट

दरम्यान, या चित्रपटाचे संगीत बप्पी लाहिरी यांनी दिले होते. तर गाणी अंजन यांनी लिहिलेली. किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजामुळे हा अल्बम खास झालेला. चित्रपटातील पाच गाणी कोणती?

1. जमाना तो है नौकर बीवी का, किशोर कुमार और निशी कोहली 2. क्या नाम है तेरा, किशोर कुमार और आशा भोसले 3. यार मिला प्यार मिला, किशोर कुमार और आशा भोसले 4. मैं नहीं दूं, बप्पी लाहिड़ी और आशा भोसले 5. ओ मेरे सजना, आशा भोसले

ज्यांना 8o च्या दशकातील हिंदी चित्रपट आणि बप्पी लाहिरींचे संगीत आठवते, त्यांच्यासाठी आजही ‘नौकर बीवी का’ हा एक रंजक चित्रपट आहे.

Follow Us
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचं विधान...
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद देण्याची तयारी