36 तास फोन बंद, श्राद्धालाही पोचला नाही.. ‘दृश्यम’ पाहून वडिलांना संपवणाऱ्या आरोपीच्या कशा आवळल्या मुसक्या ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्यानंतर ओळख लपवण्यासाठी आणि तपासात अडकू नये यासाठी आरोपीने बरीच सावधानी बाळगली. प्रवासादरम्यान त्याने फोन बंद ठेवला होता आणि हत्येनंतर लगेच गावही सोडून तो गेला.

36 तास फोन बंद, श्राद्धालाही पोचला नाही..  ‘दृश्यम’ पाहून वडिलांना संपवणाऱ्या आरोपीच्या कशा आवळल्या मुसक्या ?
| Updated on: Oct 05, 2026 | 2:29 PM

बिहारच्या समस्तीपुर जिल्ह्यामध्ये एका मुलाने वडिलांची निर्घृणपणे हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दृश्यम’ चित्रपटापासून प्रेरित होऊन शंकर याने हलई ठाणे क्षेत्रातील दरबां गावात राहणाऱ्या, त्याच्या वडिलांची, रघुवीर सहान यांची हत्या केली. आरोपी सूरतमध्ये कुटुंबासह रहात होता. जमीनीवरून झालेला वाद आणि पत्नीला दिलेल्या शिव्यांमुळे नाराज होऊ शंकरने वडिलांना संपवण्याचा कट आखला आणि 2 हजार किमी दूर गावात जाऊन त्याने वडिलांची हत्या केली, असा पोलिसांचा दावा आहे.

जमीनीवरून त्याच्या वडिलांशी वाद सुरू आहे, आणि रघुवीर सहानी यांनी आपल्याला शिवीगाळ केली, असं शिवशंकर याला त्याच्या पत्नीने सांगितलं होतं , असं पोलिसांचं म्हणणं आहे. यामुळेच तो वडिलांवर नाराज होता. सूरतमध्ये रहातानाच त्याने अजय देवगणचा ‘दृश्यम’ चित्रपट पाहिला आणि त्यावरूनच प्रभावित होऊन, हत्येचा कट आखला. योजनेप्रमाणेतो सूरतहून बिहारला ट्रेनन पोहोचला. पाटणा आणि हाजीपूर येथून त्याने पटोरी स्टेशन गाठलं. तिथून ऑटोल करू तो काही अंतरावर पोहोचला, नंतर मध्येच खालीउतरून 4 किमी चालून तो त्याच्या घरी दाखल झाला.

Loading...

दरवाजात झोपलेल्या वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला

पोलिसांच्या सांगण्याानुरा, 26 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मागच्या रस्त्याने शिवशंकर त्याच्या घरी आला. नंतर त्याने कोठारात ठेवलेली कुऱ्हाड उचली आण घराबाहेर झोपलेल्या वजिलांवर हल्ला केला. जखमी झालेल्या रघुवीर यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी रात्रीच गावातून पसार झाला आणि पटोरी स्टेशन गाठून, रेल्वेने तो सूरतला पोहोचला. हत्येची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी मृतदेब ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला, घटनास्थळवारून पुरावे गोळा करण्यासाठी FSL टीमलाही पाचारण करण्यात आलं.

मोबाईल बंद ठेवणं पडलं महागात

रपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण पकडलं जाऊ नये म्हणून आरोपी शिवशंकर याने प्रवासादरम्यान मोबाईल बंद ठेवला होता. मात्र पटोरी स्टेशन गाठल्यावर त्याने काही मोबाईल ऑन करून पत्नीला कॉल करत तिच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर त्याने फोन पुन्हा बंद केला.

मात्र हीच चूक महागात पडली, कारण पोलिस तपासत हे समोर आलं होतं. त्येच्या रात्री शंकरच्या फोनचं लोकेशन पटोरी स्टेशनच्या आसपास असल्याचं तांत्रिक तपासादरम्यान पोलिसांना आढळलं होतं. त्यानंतर तब्बल 36 तासांनी मोबाईल लोकेशन सूरतमध्ये असल्याचं सापडलं. पोलिसांनी त्याचे कॉल डिटेल्स आणि टॉवर लोकेशनचं विश्लेषण केल्यावर त्यांचा संशय आणखी गाढ झाला.

वडिलांच्या श्राद्धालाही आला नाही

पोलिसांनी नातेवाईकांकडे चौकशी करून आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे शिवशंकर वर फोकस केला.वडिलांच्या मृत्यूनंतर तो श्राद्धासाठी देखील आला नाही, असंही समोर आला. त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने सूरत गाठत त्याला बेड्या ठोकल्या.वैज्ञानिक आणि तांत्रिक तपासणीमुळे आरोपीपर्यंत पोहोचण्यात मदत झाली असं पोलिसांनी सांगितलं. मोबाईल चालू करण्याची एक चूक त्याला खूप महागात पडली आणि तो अडकला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us