
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतचा दौरा केला. यावेळी त्यांनी नौसैनिकांचा उत्साह वाढवला. नौसैनिकांशी अधिकाऱ्यांशी ऑपरेशनच्या यशाबद्दल चर्चा केली. “आज INS विक्रांतवर माझे नौसैनिक वॉरियर्समध्ये येऊन मला आनंद होत आहे. भारताची समुद्री ताकत INS विक्रांतवर मी उभा आहे, त्यावेळी माझ्या मनात आनंद, गर्व आणि विश्वासाची भावना आहे. जो पर्यंत भारताच्या समुद्री सीमांची सुरक्षा तुमच्या हातात आहे, तो पर्यंत कोणी भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत करणार नाही. विक्रांतचा अर्थ होतो, अदम्य साहस, अपराजेय शक्ती. आज तुमच्यामध्ये उभा राहून या नावाचा अर्थ साकार होताना मी पाहत आहे. तुमच्या डोळ्यात जी दृढता आहे, त्यात भारताची खरी शक्ती दिसून येते. आज मी इथे फक्त संरक्षण मंत्री म्हणून आलेलो नाही. एक कृतज्ञ भारतीय म्हणून आलो आहे” असं राजनाथ सिंह म्हणाले.
“मी तुम्हाला सर्वांना ऑपरेशन सिंदूरच्या यशाच्या शुभेच्छा देतो. पहलगामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर जेव्हा भारताने ऑपरेशन सिंदूर सुरु केलं, तेव्हा आपल्या सैन्यदलांनी ज्या गतीने आणि स्पष्टतेने कारवाई केली, ते अद्भुत होतं. याने फक्त दहशतवाद्यांनाच नाही, तर त्यांचं पालनपोषण करणाऱ्यांना सुद्धा स्पष्ट संदेश गेलाय, भारत आता सहन करणार नाही. भारत आता थेट उत्तर देतो. या संपूर्ण इंटेग्रेटेड ऑपरेशनमध्ये नौदलाची भूमिका गौरवशाली होती. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी जेव्हा एअरफोर्सने पाकिस्तानी भूमीवर दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले. त्यावेळी अरबी समुद्रात तुमची आक्रमक तैनाती, मॅरिटाइम डोमेन अवेयरनेस आणि समुद्री वर्चस्वाने पाकिस्तानी नौदलाला त्यांच्या तटावरच उभं राहण्यास भाग पाडलं. ते खुल्या सागरात येण्याची हिम्मतही करु शकले नाहीत” असं राजनाथ सिंह म्हणाले.
पाकिस्तानला तुमच्या शौर्याची पूर्ण कल्पना
“पाकिस्तानला तुमच्या शौर्याची पूर्ण कल्पना आहे. पाकिस्तानला माहित आहे, भारतीय नौसेना जोरात येते, तेव्हा काय होतं. 1971 च उदहारण आहे. भारतीय नौदलाने Action घेतल्यानंतर एका पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. जर, ऑपरेशन सिंदूरच्यावेळी नौदल आपल्या फॉर्ममध्ये आलं असतं, तर पाकिस्तानचे दोन नाही, चार तुकडे झाले असते” असं राजनाथ सिंह म्हणाले.