ही नव्या वर्षाची सुरुवात आहे का?…नववर्षाचा जल्लोष सुरू असताना दिल्ली भूकंपाने हादरली; धक्के बसताच लोक घराबाहेर पळाले

| Updated on: Jan 01, 2023 | 6:46 AM

2022च्या नोव्हेंबरमध्ये दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले होते. 29 नोव्हेंबर रोजी दिल्लीत 2.5 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याचं केंद्र दिल्लीच्या पश्चिमेकडे होते.

ही नव्या वर्षाची सुरुवात आहे का?...नववर्षाचा जल्लोष सुरू असताना दिल्ली भूकंपाने हादरली; धक्के बसताच लोक घराबाहेर पळाले
.नववर्षाचा जल्लोष सुरू असताना दिल्ली भूकंपाने हादरली
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: संपूर्ण जग नव्या वर्षासह स्वागत करत असतानाच आज पहाटे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीच्या आसपासच्या परिसरात भूकंपाचे तीव्र झटके जाणवल्यानंतर नागरीक चांगलेच घाबरले. अनेकांनी घराच्याबाहेर पळ काढला. काही काळ लोकांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, यावेळी कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. रात्री 1 वाजून 19 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. हरियाणाच्या झज्जर येथे भूकंपाचं केंद्र होतं. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.8 एवढी नोंदवण्यात आली, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे.

हे सुद्धा वाचा

एका न्यूज एजन्सीनेही भूकंपाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत आणि आसपासच्या परिसरात सकाळी 1 वाजून 19 मिनिटांनी भूकंपाचे झटके जाणवले. त्याची तीव्रता 3.8 इतकी नोंदवण्यात आली. हरियाणाच्या झज्जर येथे भूकंपाचे केंद्र होते. तसेच त्याची खोली जमिनीपासून 5 किलोमीटर आत होती.

 

भूकंपाचे झटके जाणवल्यानंतर अनेकांनी घर आणि हॉटेलातून पळ काढला. त्यानंतर काही काळ हे नागरिक बाहेरच थांबले होते. मात्र, भूकंपाचा धोका टळल्याचं लक्षात आल्यानंतर पुन्हा एकदा नागरीक आपल्या घरात आणि हॉटेलात गेले.

2023चं स्वागत करण्यासाठी अनेक लोक दिल्लीत आले आहेत. दिल्लीकरांना या भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर अनेकांनी ट्विट करून त्याबाबतची विचारणा केली. एका यूजर्सने तर मला दिल्लीत आता भूकंपाचे धक्के जाणवले का? असा सवाल करणारं ट्विट केलं.

सुलिना नावाच्या व्यक्तीने तर दिल्लीत भूकंपाचे झटके, ही नव्या वर्षाची सुरुवात आहे का? असा सवाल केला आहे. दुसऱ्या व्यक्तीने केवळ मलाच वा इतरांनाही दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचा धक्के जाणवले का? असा सवाल केला आहे.

 

दरम्यान, 2022च्या नोव्हेंबरमध्ये दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले होते. 29 नोव्हेंबर रोजी दिल्लीत 2.5 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याचं केंद्र दिल्लीच्या पश्चिमेकडे होते. त्याआधी 12 नोव्हेबर रोजी दिल्ली, नोएडा, गाझियाबाद आणि बिजनौरला भूकंपाचे धक्के जाणवले होते.

तसेच 9 नोव्हेंबर रोजी दिल्लीत पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी भूकंपाचे तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 इतकी नोंदवली गेली होती. त्याचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता.

मात्र, हे भूकंपाचे धक्के दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडसहीत देशाच्या सात राज्यात जाणवले होते. या भूकंपात नेपाळमध्ये मोठं नुकसान झालं होतं. यावेळी नेपाळमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता.