Maharashtra Breaking News Live : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…

| Updated on: Jan 02, 2023 | 5:53 AM

Maharashtra Breaking News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Latest Breaking NewsImage Credit source: tv9 marathi

मुंबई : मध्यरात्री जगभरात नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं. सरत्या वर्षाला निरोप देत लाखो लोकांनी नव्या वर्षाचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. दुसरीकडे दिल्लीत मध्यरात्री भूकंपाचे धक्के बसले. तर क्रिकेटपटू ऋषभ पंत याला पुढील उपचारासाठी मुंबईत आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Jan 2023 11:16 PM (IST)

    कारखान्याच्या स्फोटात 4 ठार, 3 गंभीर

    सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील फटाका कारखान्याचे स्फोट प्रकरण

    फटाका कारखान्याचे मालक युसुफ मनियार घटनेनंतर बेपत्ता

    बार्शी तालुक्यातील पांगरी-शिराळे गावात त्यांचा फटाका कारखाना होता

    या कारखान्यातील चार कर्मचारी ठार झाले, तीन कर्मचारी गंभीर जखमी

    प्रशासनाकडून अद्यापही आग विझविण्याचे कार्य सुरू आहे

  • 01 Jan 2023 10:35 PM (IST)

    रत्नागिरी : बर्निंग कारचा थरार

    गुहागर येथून वाशी नवी मुंबईला जाणाऱ्या धावत्या मारुती स्वीफ्ट डिजायर कारने अचानक घेतला पेट

    मुंबई गोवा महामार्गावर खेड मोरवंडे गावानजीक घडली घटना

    धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने प्रसंगावधान राखून गाडीतील चार प्रवासी बाहेर पडले

    सुदैवाने जीवितहानी टळली मात्र गाडीतील बॅगा आणि इतर वस्तू जळाल्या

  • 01 Jan 2023 08:30 PM (IST)

    मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरजवळ भीषण अपघात

    एक महिला ठार तर लहान मुलासह तीन जण जखमी

    कुमार गार्डन हॉलजवळ संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात

    मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या टोयोटो गाडीची तिहेरी अपघात

    स्कुटी आणि रीक्षाचा चक्काचूर झाला

  • 01 Jan 2023 06:35 PM (IST)

    सोलापुरातील स्फोटात तिघांचा मृत्यू

    बार्शीतल्या पांगरी येथील फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटात तिघांचा मृत्यू

    जवळपास नऊ जण जखमी असून सर्वांना रुग्णालयात उपचारासाठी हलवले

    मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून, जखमींना मदत करण्यासाठी यंत्रणेचे प्रयत्न सुरू

    सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

  • 01 Jan 2023 06:19 PM (IST)

    इगतपुरी येथील आगीच्या घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये देणार : मुख्यमंत्री

    इगतपुरी येथील आगीच्या घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई आणि मदत म्हणून 5 लाख रुपये देणार, जखमींचा संपूर्ण उपचार सरकारकडून करण्यात येणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, घटनास्थळाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली प्रतिक्रिया

  • 01 Jan 2023 05:56 PM (IST)

    थर्डफर्स्टच्या जल्लोषात कामगाराची हत्या

    जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील जिनिंग फॅक्टरीमधील घटना

    ताट्या वाजविण्यावरून बिहारी व मराठी कामगारांमध्ये वाद

    मराठी कामगार काळू सोनवणे यांना लाकडी दांड्याने मारले

    १० बिहारी कामगारांना पोलिसांनी घेतले ताब्यात

  • 01 Jan 2023 05:53 PM (IST)

    मुलाने जन्मदात्याला संपविले

    सोलापूर जिल्ह्यातील कासेगाव येथील दुर्घटना

    प्रेमाला विरोध करणाऱ्या बापालाचं संपविले

    अफजल बागवान असं मृतकाचं नाव

    मुलगा सोहेलनं प्रेयसीच्या मदतीनं केली हत्या

    डोळ्यात तिखटं टाकलं, नंतर पेट्रोल टाकून संपविले

  • 01 Jan 2023 02:03 PM (IST)

    केंद्रीय मंत्री भागवत कराड सिल्लोड येथील अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयात पोहोचले

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अब्दुल सत्तार यांच्यात चर्चा सुरू

    15 मिनीटापासून चर्चा सुरू

    सत्तार यांच्या सिल्लोड येथील कार्यालयात चर्चा सुरू

    कार्यक्रमाआधीच मुख्यमंत्री आणि सत्तार यांच्यात खलबते

  • 01 Jan 2023 02:01 PM (IST)

    सावित्रीबाई फुलेंनी शाळा सुरू केलेला पुण्यातील भिडेवाडा अजूनही पडक्या अवस्थेत

    राज्य सरकारने राष्ट्रीय स्मारक घोषित केलं, मात्र पुर्नविकास कधी होणार

    आजच्या दिवशी 1 जानेवारी 1848 ला भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा झाली होती सुरू

    एवढ्या वर्षानंतरही भिडेवाडा अजूनही दुर्लक्षितचं

  • 01 Jan 2023 01:58 PM (IST)

    नवीन वर्षाची सकाळ नागपुरात हत्येच्या घटनेने उजाडली

    भररस्त्यात युवकाची हत्या, सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली घटना

    तलवार आणि चाकूने भोकसून केली हत्या

    एका अल्ट्रो कारने आलेल्या तिघांनी केली हत्या

    मृतकाच नाव राजेश मेश्राम

    जुन्या वादातून हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती

    मृतक एका पान टपरी जवळ थांबला असताना अचानक त्याच्यावर करण्यात आला हल्ला

    अज्ञात आरोपींचा शोध सुरू

  • 01 Jan 2023 01:55 PM (IST)

    नव्या वर्षीच्या पहिल्याच दिवशी वसईत कार-ट्रकचा भीषण अपघात

    मद्यधूंद अवस्थेत कार चालकाने आधी एका बाईकला उडवले, त्यानंतर कारने समोरून येणाऱ्या कारला धडक दिली

    अपघातात कारचा पुढचा भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे

    सीटबेल्ट लावले असल्याने आणि एअरबॅग उघडल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही

    मात्र बुलेट चालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे

    वसईच्या अंबाडी ब्रिजवर आज 11 च्या सुमारास झाला अपघात

    वाहतूक आणि माणिकपूर पोकीसानी अपघातग्रस्त कार बाजूला करून वाहतूक सुरळीत केली

  • 01 Jan 2023 01:00 PM (IST)

    नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनीत मोठी आग

    काही जण जखमी झाल्याचीही माहिती, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

    आग विझविण्याचे प्रयत्न सुरू, मोठे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती

    काही जण अडकल्याची देखील भीती

  • 01 Jan 2023 12:29 PM (IST)

    सोलापूर ते उमरगा या राष्ट्रीय महामार्गावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आंदोलन

    फुलवाडी आणि तलमोड टोल नाक्यावर टोल वसुली बंद करण्यासाठी शिवसेना आक्रमक

    31 डिसेंबर 2022 पूर्वी टोल रस्त्याची कामे पूर्ण करा अन्यथा आक्रमक आंदोलनाचा इशारा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिला होता

    अनेक कामे अपूर्ण असतानाही टोल वसुली सुरु असल्याने आंदोलन

    शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

    1 जानेवारी 2023 पासून टोल वसूली बंद करा, असा दिला होता इशारा

    टोलवसुली सुरुच असल्याने शिवसेना आक्रमक

    शिवसेना खासदार ओमराजे यांनी टोल बंद करण्याच्या आवाहनानंतर शिवसैनिकांचे आक्रमक आंदोलन

  • 01 Jan 2023 11:18 AM (IST)

    नवीन वर्षाच्या निमित्ताने अक्कलकोटमध्ये हजारोंच्या संख्येने भाविक दाखल

    स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक अक्कलकोटला आले

    tv9 च्या माध्यमातून राज्यातील सर्व स्वामी भक्तांना दर्शन घडवल्या जातंय

    स्वामी समर्थांच्या दर्शनाने वर्षाची सुरुवात करण्यासाठी हजारो भक्तगण अक्कलकोट नगरीत

    अक्कलकोटमध्ये दर्शन रांग दोन किलोमीटरपर्यंत

    मंदिरापासून फत्तेसिंह चौकाच्या पुढे गेली दर्शन रांग

  • 01 Jan 2023 11:16 AM (IST)

    सिल्लोड शहरात राज्यस्तरीय कृषी महोत्सवाची जय्यत तयारी

    सिल्लोड शहरात राज्यस्तरीय कृषी महोत्सवाची जय्यत तयारी

    मेडिकल कॉलेजच्या मैदानावर भरतोय सिल्लोड महोत्सव

    आज दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

    देशभरातील 500 कंपन्या चार कृषी विद्यापीठे कृषी महोत्सवात सहभागी

    एकाच दिवशी 2 लाख शेतकरी देणार कृषी महोत्सवाला भेट

    कृषी महोत्सवात सकाळपासून गर्दी होण्यास झाली सुरुवात

  • 01 Jan 2023 10:33 AM (IST)

    औरंगाबादेत ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादात राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्षावर जीवघेणा हल्ला

    राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे यांच्यावर जीवघेणा हल्ला

    तरमळे यांची प्रकृती चिंताजनक, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

    पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा होता वाद

    सात आरोपींविरोधात बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    अनिकेत अशोक नागे, राजू बनकर, आकाश अशोक नागे, दिनेश राठोड, अशोक रामनाथ नागे, सुनिल रुपचंद खरात, पांडुरंग भाकचंद सर्व अशी आरोपींची नावे आहेत

  • 01 Jan 2023 10:19 AM (IST)

    दिल्लीच्या ग्रेटर कैलाश परिसरात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी दुर्घटना

    दिल्लीच्या ग्रेटर कैलाश परिसरात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी दुर्घटना

    रविवारी सकाळी वृद्धाश्रमाला लागली आग

    आगीत दोघांचा मृत्यू; 13 जणांची सुरक्षित सुटका

    13 जणांपैकी एकाची प्रकृती गंभीर, मॅक्स रुग्णालयात केलं दाखल

  • 01 Jan 2023 10:18 AM (IST)

    कोल्हापुरात आज हिंदू जन आक्रोश मोर्चा

    कोल्हापुरात आज हिंदू जन आक्रोश मोर्चा

    लव्ह जिहाद, धर्मांतर बंदी, गो हत्या बंदी कायद्यांच्या मागणीसाठी निघतोय मोर्चा

    कोल्हापूरच्या बिंदू चौकातून भवानी मंडपापर्यंत निघणार मोर्चा

    मोर्चात हिंदुत्ववादी संघटनाच्या हजारो कार्यकर्ते सहभागी होणार

    कार्यकर्ते बिंदू चौकात जमायला सुरुवात

    भगवे ध्वज आणि टोप्या घालून हिंदुत्ववादी कार्यकर्ते बिंदू चौकात जमले

  • 01 Jan 2023 10:12 AM (IST)

    नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची गर्दी

    नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची गर्दी

    त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक दाखल

    मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची रांग

  • 01 Jan 2023 10:02 AM (IST)

    पुण्यातील ऐतिहासिक भिडेवाड्यातून सन्मान रॅली

    पुण्यात सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी 1 जानेवारी 1848 ला मुलींची पहिली शाळा सुरू केली होती

    भिडेवाडा सरकारने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलाय

    आज सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंच्या कार्यानिमित्त सन्मान रॅली दिवस साजरा करण्यात येतोय

    शेकडो कार्यकर्ते, अभ्यासक भिडेवाड्यात जमले

  • 01 Jan 2023 09:24 AM (IST)

    नवीन वर्षात पुणेकरांसाठी आनंदाची बातमी

    नवीन वर्षात पुणेकरांसाठी आनंदाची बातमी

    पिंपरी चिंचवड ते वनाज या रस्त्यावर लागणारा वाहतुकीचा वेळ कमी होणार

    पिंपरी चिंचवड ते वनाज मेट्रोची ट्रायल पार पडली

    लवकरच या मार्गावर प्रवास सुरू होणार

    सिव्हिल कोर्ट स्थानकात इंटरचेंज करून प्रवांशांना प्रवास करता येणार

    40 मिनीटांत होणार प्रवास, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी काल मेट्रोची ट्रायल घेतली

    दीड तासाचा प्रवास आता होणार 40 मिनिटांत

    मेट्रोचा मोठा टप्पा लवकरच सुरु होणार ...

  • 01 Jan 2023 08:09 AM (IST)

    दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांची मोठी गर्दी

    जवळपास 2 कि.मी दर्शनाची रांग

    नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी पुणेकर गणपती बाप्पा चरणी

    गणपती बाप्पाच्या मूर्तीला आकर्षक साज चढवण्यात आलाय

    मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली आहे

  • 01 Jan 2023 06:11 AM (IST)

    शिर्डीत भाविकांकडून नववर्षाच जल्लोषात स्वागत

    भाविकांनी साईभजनावर ठेका धरला

    ठिक मध्यरात्री 12 वाजता साईनामाचा जयघोष करत भाविकांनी एकमेकांना पेढे भरवत, आलिंगन देत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या

    साईमंदिरात साईबाबांची ललकारी देत संस्थानच्या वतीने भाविकांना शुभेच्छा देण्यात आल्या

    महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नववर्षानिमित्त साईदर्शनासाठी साईदरबारी हजेरी लावली

    साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवल्याने लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करताना दिसून आले

  • 01 Jan 2023 06:07 AM (IST)

    2022 चा निरोप घेतल्यानंतर आता नवीन वर्ष 2023 चे आगमन झालंय

    नव वर्ष साजरे करण्यासाठी मुंबईतील अनेक पर्यटनस्थळांवर लोकांनी गर्दी केली होती

    मढ मार्वे रोडवर लोकांची प्रचंड गर्दी झाली होती

    नवीन वर्ष साजरे करण्यासाठी लोक येत आहेत आणि जात आहेत

    मुंबईतूनच नाही तर देशाच्या विविध राज्यातून लोक नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मढला आले

  • 01 Jan 2023 06:05 AM (IST)

    31st नंतर भायखळ्यात नाकाबंदी / विधानभवनाचे स्टिकर लावणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

    मुंबईतील भायखळ्यात नवीन वर्षाचे आगमन होताच पोलीस नाकाबंदी करून कारवाई करताना दिसत होते

    नाकाबंदीदरम्यान बहुतांश वाहनांवर विधानभवनाचे स्टिकर्स आणि काळी फिल्म दिसून आली

    तपासाअंती पोलिसांनी स्वतः उभे राहून विधानभवनाचे स्टिकर आणि काळी फिल्म हटवली

  • 01 Jan 2023 06:03 AM (IST)

    कोरेगाव भीमा येथे शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याला सुरुवात

    विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून आंबेडकरी अनुयायी कोरेगाव भीमामध्ये दाखल

    शौर्यदिनाचे यंदाचे 205 वे वर्ष,

    शौर्यदिनाची जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी

  • 01 Jan 2023 05:57 AM (IST)

    विदेशी पाहुण्यांनी मुंबईत जल्लोषात केलं नव वर्षाचं स्वागत

    बुर्ज खलिफा, अमेरिका, कॅनडा या देशातील नागरिक मुंबईत

    दादरच्या छत्रपती शिवाजी पार्कवर फटाक्यांची आतिषबाजी करत नाचत नवीन वर्षाचे केले स्वागत

    2023 मध्ये कोविडचे संकट भारतावर येऊ नये म्हणून विदेशी पाहुण्यांनीही देवाकडे घातले साकडे

Published On - Jan 01,2023 5:54 AM

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.