AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना ईडीचा दणका, 100 कोटींची मालमत्ता जप्त!

कोट्यवधी रुपयांच्या कथित घोटाळ्यात सिद्धरामय्या याबच्याशी सबंधी 92 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

मोठी बातमी! कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना ईडीचा दणका, 100 कोटींची मालमत्ता जप्त!
KARNATAKA CM SIDDARAMAIAH
| Updated on: Jun 10, 2025 | 3:03 PM
Share

ED Action On Karnataka CM Siddaramaiah : कर्नाटकच्या राजकारणातून सर्वांत मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार  कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची एकूण 100 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. कोट्यवधी रुपयांच्या मुडा (MUDA) कथित घोटाळ्यात सिद्धरामय्या याबच्याशी सबंधीत एकूण 92 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

ईडीने नेमकी काय कारवाई केली?

सक्तवसुली संचालनालयाच्या बंगळुरू येथील विभागीय कार्यालयाने एकूण 92 स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. या स्थावर मालमत्तांचे बाजारमूल्य अंदाजे 100 कोटी रुपये आहे. ईडीने ही कारवाई आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा म्हणजेच पीएमएलए कायद्याअंतर्गत केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता या गृहनिर्माण सहकारी संस्था किंवा मुडा अधिकाऱ्यांसह इतर प्रभवशाली व्यक्तींच्या सोईसाठी बनावट असलेल्या व्यक्तींच्या नावावर आहेत.

अगोदर वेगवेगळ्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

म्हैसुरच्या लोकायुक्त पोलिसांनी आयपीसीच्या वेगवगळ्या कलमांतर्गत तसेच 1988 सालाच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सिद्धरामय्या तसेच इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्याची दखल घेऊन ईडीने या कथित घोटाळ्याची चौकशी चालू केली होती. या चौकशीअंतर्गत आता 100 कोटींची ही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

सिद्धरामय्या यांच्यावर नेमका आरोप काय?

सिद्धरामय्या यांच्यावर त्यांनी त्यांच्या राजकीय प्रभावाचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर केल्याचा आरोप आहे. म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी अर्थात MUDA ने 3 एकर 16 गुंठे जमीन अधिगृहित केली होती. याच जमिनीच्या बदल्यात सिद्धरामय्या यांनी त्यांची पत्नी बीएम पार्वती यांच्या नावे 14 आलिशान साईट्स नावावर करून घेतल्याचा आरोप आहे. मुडाने अधिगृहित केलेल्या जमिनींचे मूल्य हे 3 लाख 24 हजार 700 रुपये आहे. पण मुडाने भरपाई म्हणून दिलेल्या आलिशान जागांचे मूल्य हे जवळपास 56 कोटी रुपये आहे, असा दावा केला जातोय. मुडाने केलेल्या याच कथित व्यवहारावर आक्षेप घेण्यात आला होता.

दरम्यान, ईडीच्या या कारवाईनंतर सिद्धरामय्या यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र आता ईडीच्या कारवाईवर ते नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ईडीच्या या कारवाईमुळे कर्नाटकच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.